• Wed. Jun 18th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

सुरत येथे संतशिरोमणी नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळा उत्साहात साजरा. सत्कार करताना शाल बुके न देता शैक्षणिक साहित्य देऊन स्वागत करावे- डॉ.मनिलाल शिंपी

Aug 5, 2024

Loading

सुरत येथे संतशिरोमणी नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळा उत्साहात साजरा.

सत्कार करताना शाल बुके न देता शैक्षणिक साहित्य देऊन स्वागत करावे:
डॉ.मनिलाल शिंपी

सुरत( प्रतिनिधी) सुरत येथील श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाजाचा वतीने श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा ६७४ वा
संजीवनी समाधी पालखी सोहळा संपन्न झाला.
यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रकाश ताराचंद मेटकर व प्रमुख अतिथी म्हणून अ.भा.म.संसथेचे विश्वस्त ज्ञानेश्वर भांडारकर, गुजरात राज्य संघटक चंद्रकांत नामदेव शिंपी,तसेच आर.एस.पी कमांडर मनिलाल शिंपी सोबत नटवरलाल वर्मा, विशेष अतिथी म्हणून सुरत महानगरपालिका चे डेप्युटी मेयर डॉ. नरेंद्र पाटील , सुरत जिल्हा अध्यक्ष श्री प्रकाश सोनवणे,सुरत जिल्हा महिला अध्यक्षा सौ.संगिताताई जगन्नाथ बोरसे,, स्थानिक महिला अध्यक्षा सौ. विजया ताई खैरनार, युवा अध्यक्ष जितेन्द्र बागुल व पदाधिकारी तसेच कार्यकारी मंडळ, महिला कार्यकारी मंडळ उपस्थित होते.
संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा फोटो प्रतिमा पालखीत ठेऊन पूजन करून
भजनी मंडळाच्या निनादात मुख्य रस्त्यावर वरून संत नामदेव महाराज यांचे मंदीरात पूजा करून मिरवणूकीची
समाज मंदिर निलगिरी सुरत येथे सांगता करण्यात आली. सुरत येथे संत शिरोमणी नामदेव महाराज संजीवनी सोहळा कार्यक्रम चांगल्या प्रकारे साजरा करण्यात आला कार्यक्रमात सर्व समाज बांधव व कार्यकारी मंडळ व नवयुवक मंडळ व महिला मंडळ व भजनी मंडळ यांनी यथाशक्ती आपले योगदान दिले.

प्रमुख पाहुणे मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपचे प्रमुख डॉ.मणिलाल शिंपी यांचा संकल्पनेनुसार, सामाजिक कार्यात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या तीन भगिनींना पैठणी देऊन गौर आले.यावेळी बोलताना डॉ. मनिलाल शिंपी यांनी सांगितले की, समाजामधील अनिष्ट प्रथा, प्रकार कुठेतरी थांबवण्याची गरज आहे,आपल्या समाजामध्ये घटस्फोटाचे प्रमाण वाढले आहे, व्यवसाय करणाऱ्या तरुणांना कमी लेखलं जात आहे, उच्च शिक्षण आणि पॅकेज मागे मुलीचे पालक व्यवसाय करणाऱ्या तरुणांना दुर्लक्षित करत आहेत.तरी उत्कृष्ठ टेलरकाम करणारा , किंवा इतर कोणत्याही व्यवसायात असलेल्या तरुणांना स्फूर्ती देणारा उपक्रम घेऊन समाजातील विवाहापासून वंचित असलेल्या तरुनांबाबत मुलींचा पालकांनी आणि मुलींनी सकारात्मक विचार करावा.असे आव्हान केले.विश्वस्त ज्ञानेश्वर भांडारकर यांनीही समाजाच्या विविध उपक्रमाबाबत माहिती दिली. डेप्युटी मेयर सुरत महानगरपालिका डॉ. नरेंद्रजी पाटील यांनी आपल्या मनोगतातून समाज प्रबोधन व भारत सरकारच्या नवीन योजना, तसेच शिंपी समाजातील सर्व कुटुंबांचे रेशन कार्ड त्वरित तयार करून घ्या,एका दिवसात कार्ड तयार करून देण्यात येईल,तसे कॅम्प चे नियोजन करा, असे सुरत येथील शिंपी समाज मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना सांगितले. एकही कुटुंब बिगर रेशन कार्डचे राहणार नाही याची आपण खात्री करावी यासाठी पाहिजे ती मदत मी करण्यास तयार आहे असे आश्वासन उपमहापौर डॉ.नरेंद्र पाटील यांनी दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नामविश्व चे सहसंपादक नरेंद्र खैरनार यांनी केले. तर व्यासपीठावरील व्यवस्था किशोर शिंपी व किशोर पवार यांनी सांभाळली.
कार्यक्रमाचे शेवटी प्रकाश ताराचंद मेटकर यांनी सर्वांचे आभार मानले. संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त सुरत शिंपी समाजातर्फे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. हजारो समाज बांधवांनी घेतला.व मनापासून आनंद व्यक्त केला.सदर कार्यक्रम सफलता पूर्वक पार पाडण्यासाठी सर्वश्री नानासाहेब इसई, श्याम मेटकरी, नितीन मेटकर,लोटन शिंपी, रमेश सोनवणे, बंसिलाल जगदाळे, आत्माराम संदानशिवे, सुरेश जगताप, ,सुधीर कापडणे, कैलास बागुल, राजेन्द्र सोनवणे, राजेन्द्र देवरे, प्रकाश कापूरे व संपूर्ण स्थानिक महिला मंडळाच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *