• Tue. Jun 17th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

मुक्त सृजन संस्था व साहित्य पत्रिकेचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

Aug 6, 2024

Loading

मुक्त सृजन संस्था व साहित्य पत्रिकेचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

मुक्त सृजन संस्था व साहित्य पत्रिकेचे राज्यस्तरीय उत्कृष्ट वाड्मय निर्मितीचे पुरस्कार साहित्य पत्रिकेचे संपादक डॉ. महेश खरात यांनी जाहीर केले . सन २०२३-२४ मधील या पुरस्काराचे मानकरी आहेत.आनंद पेंढारकर, डोंबिवली, उमेश मोहिते, आंबेजोगाई, स्मिता दातार, मुंबई, संतोष जाधव, छत्रपती संभाजीनगर, प्रमोद नारायणे, वर्धा, सविता करंजकर -जमाले, धाराशिव, सहदेव रसाळ, धाराशिव यांना हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
मुक्त सृजन मातोश्री वालाई काव्य गौरव पुरस्कार डोंबिवली -पूर्व येथील आनंद पेंढारकर यांच्या ‘मी एक बोन्साय ‘ या कवितासंग्रहास घोषित करण्यात येत आहे. आद्य कथाकार चक्रधर स्वामी मुक्त सृजन कथा पुरस्कार आंबेजोगाई येथील उमेश मोहिते यांच्या ‘ खोडा ‘ या कथासंग्रहास घोषित करण्यात येत आहे. कुलगुरू नागनाथ कोत्तापल्ले मुक्त सृजन कादंबरी पुरस्कार मुंबई येथील स्मिता दातार यांच्या ‘अयोध्येची उर्मिला ‘ या कादंबरीस जाहीर करण्यात आला आहे. महात्मा जोतीराव फुले मुक्त सृजन वैचारिक व समीक्षक पुरस्कार छत्रपती संभाजीनगर येथील डॉ.संतोष जाधव यांच्या ‘ग्रामीण कादंबरीतील राजकीय चित्रण ‘ या समीक्षा ग्रंथास जाहीर करण्यात आला आहे. कै. नारायणराव दहिफळे मुक्त सृजन चरित्र -आत्मचरित्र पुरस्कार वर्धा येथील प्रमोद नारायणे यांच्या ‘मी पॉझिटिव्ह आलो’ या ग्रंथास घोषित करण्यात आला आहे. कै. विठ्ठल ठोंबरे मुक्त सृजन बालसाहित्य पुरस्कार धाराशिव येथील सविता करंजकर -जमाले यांच्या ‘फ्रुटी कोणाची ‘ या बाल कादंबरीस जाहीर करण्यात आला आहे. तसेच मुक्त सृजन संकीर्ण पुरस्कार धाराशिव येथील डॉ.सहदेव रसाळ यांच्या ‘परिवर्तन यात्री ‘ या पुस्तकास जाहीर करण्यात आला आहे.
पुरस्काराचे स्वरूप २५००/- रुपये, स्मृतीचिन्ह, मानपत्र, शाल, पुष्पगुच्छ असे आहे. मुक्त सृजन साहित्य पत्रिकेचे संपादक डॉ. महेश खरात, सहसंपादक डॉ. संतोष देशमुख, डॉ.रामकिशन दहिफळे,कवयित्री प्रिया धारूरकर, हनुमंत सोनवणे,डॉ.किसन माने, डॉ.निलेश देगावकर हे बैठकीस हजर होते . सदर पुरस्काराचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ.रवींद्र शोभणे यांनी कादंबरी या साहित्यप्रकाराचे समीक्षण केले. लातूर येथील राजर्षी शाहू महाविद्यालयाचे मराठी विभागप्रमुख डॉ.संभाजी पाटील यांनी कथा या साहित्यप्रकाराचे परीक्षण केले. सांगोला येथील डॉ.गणपतराव देशमुख विज्ञान महाविद्यालयाचे मराठी विभागप्रमुख डॉ. किसन माने यांनी कविता या साहित्य प्रकाराचे परीक्षण केले. डॉ. सना पंडित , नागपूर यांनी वैचारिक लेखन व समीक्षा या प्रकाराचे परीक्षण केले. डॉ.अर्चना सोनवणे -काटकर यांनी आत्मचरित्र या साहित्यप्रकाराचे परीक्षण केले.तर डॉ.निलेश देगावकर यांनी बालसाहित्य व संकीर्ण विभागाचे परीक्षण केले. सप्टेंबर -२०२४ मध्ये मुक्त सृजन वाड्मय पुरस्कार सन्मानपूर्वक छत्रपती संभाजीनगर येथे प्रदान करण्यात येतील. पुरस्काराचे हे पाचवे वर्ष असून १७७ इतक्या साहित्यकृती सर्व पुरस्कारासाठी आल्या होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *