मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून आंतरराष्ट्रीय खेळाडू आर्यन शुक्ल यास महाराष्ट्र शासनाच्या वतीने १० लाख रुपयांची मदत
जर्मनी मधील पॅडरबोर्न येथे होणाऱ्या मेंटल कॅल्क्युलेशन वर्ल्ड कप २०२४ मध्ये आर्यन शुक्ल करणार देशाचे प्रतिनिधित्व
मुंबई,नाशिक,दि.२५ ऑगस्ट:- राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून आंतरराष्ट्रीय खेळाडू आर्यन शुक्ल यास महाराष्ट्र शासनाच्या वतीने १० लाख रुपयांची मदत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते सुपूर्त करण्यात आली आहे. त्यामुळे जर्मनी मधील पॅडरबोर्न येथे होणाऱ्या मेंटल कॅल्क्युलेशन वर्ल्ड कप २०२४ मध्ये आर्यन शुक्ल करणार देशाचे प्रतिनिधित्व करू करणार आहे.
आंतरराष्ट्रीय खेळाडू आर्यन शुक्ल व त्याच्या कुटुंबियांनी नुकतीच राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची यांच्या कार्यालयात भेट घेऊन जर्मनी मधील पॅडरबोर्न येथे होणाऱ्या मेंटल कॅल्क्युलेशन वर्ल्ड कप २०२४ या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी राज्य शासनाकडून मदत मिळावी अशी मागणी केली. त्यानंतर मंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नाशिक येथे महिला सक्षमीकरण मेळाव्यास आल्यानंतर खेळाडू आर्यन शुक्ल व त्याच्या कुटुंबीयांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन मदत देण्याची मागणी केली. त्यानंतर आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर खेळाडू आर्यन शुक्ल यास मुख्यमंत्री सहायता निधीतून १० लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. मंत्री छगन भुजबळ, मंत्री दादाजी भुसे यांच्यासह मंत्रीमंडळातील सहकारी मंत्री उपस्थित होते.
कु.आर्यन नितीन शुक्ल, वय १४ वर्षे, रा.नाशिक हा आंतरराष्ट्रीय खेळाडू असून सन २०२२ मध्ये पॅडरबोर्न, जर्मनी मध्ये आयोजित Mental Calculation World Cup-2022 विश्वविजेता आहे. तसेच मिलान, इटली मध्ये आयोजित Lo Show Dei Record मध्ये आर्यनने “The fastest time to mentally add 50 five- digit numbers in 25.19 seconds” मध्ये करून Guinness World Records केलेले आहे. कु. आर्यन शुक्ल याने वयाच्या ८व्या वर्षापासून विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये जागतिक स्तरावर नेत्रदीपक कामगिरी करून अनेक पदके जिंकली आहेत.
आगामी Mental Calculation World Cup-2024 साठी आर्यन जर्मनी येथे भारताचे प्रतिनिधित्व वर्तमान विश्वविजेता असतांना करणार आहे. सदरहू स्पर्धेत जगातील फक्त ४० आघाडीचे सर्व वयोगटातील स्पर्धक भाग घेतात. ही स्पर्धा दि. १३ ते १५ सप्टेंबर २०२४ जर्मनी मधील पॅडरबोर्न या शहरात आयोजित केली आहे. कु. आर्यन शुक्ल आणि त्याचे वडील श्री. नितीन शुक्ल दि. ११ ते १७ सप्टेंबर दरम्यान स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी जाणार आहे.
राज्य शासनाकडून सदर खेळाडूला आर्थिक मदत मिळाल्याने तो आता आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगली कामगिरी करू शकेल.