• Tue. Jun 17th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

5 सप्टेंबर 2024 रोजी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा ——-!

Sep 6, 2024

Loading

5 सप्टेंबर 2024 रोजी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा ——-!

अमळनेर येथील श्रीमती इंदिरा गांधी विद्या मंदिर शाळेत 5 सप्टेंबर 2024 रोजी शिक्षक डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात आला. कारण डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे एक तत्त्ववेत्ता होऊन गेले होते. आणि ते शिक्षकी पदापासून तर देशाच्या सर्वोच्च राष्ट्रपती पदापर्यंत त्यांनी मानाचे स्थान मिळवले होते. म्हणून त्यांचा जन्मदिवस हा दरवर्षी त्यांच्या इच्छेनुसार शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात यावा ! असे त्यांनी जाहीर केले होते. त्यानुसार त्यांचा जन्मदिवस दरवर्षी शिक्षक दिन म्हणून साजरा करून त्यानिमित्ताने शिक्षकांमधून चांगल्या प्रकारे कामगिरी करणाऱ्या शिक्षक बंधू भगिनी यांना विविध क्षेत्रात आदर्श पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून उपक्रमशील शिक्षक श्री पी. एम. ठाकरे यांनी आपल्या मनोगतातून विचार व्यक्त करताना सागितले की, डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन हे शिक्षक पदापासून देशाच्या सर्वोच्च पदापर्यंत म्हणजे राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचले.
परंतु त्यांच्याही आधी ज्यांनी पिढ्यानपिढ्या समाजातील अंधकार दूर करून शिक्षणाची मशाल पेटवली असे क्रांतीज्योती महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनीच शिक्षणाचे खरे द्वार सर्व दिनदलित समाजासाठी त्यांच्या खालील प्रमाणे महामंत्रातून दिसून येते.
विद्याविना मती गेली,
मतीविना नीती गेली,
नीतीविना गती गेली,
गतीविना वित्त गेले,
वित्तविना शूद्र खचले,
एवढे अनर्थ एका,अविद्येने केले !
म्हणजे शिक्षण नसेल तर माणसाची किती हानी आपल्या जीवनात होऊ शकते याचे जिवंत चित्र फुले दांपत्यांनी समाजासमोर या महामंत्रातून वास्तव रूपात उभे केले. एवढेच नव्हे तर त्यावेळच्या प्रतिकूल परिस्थितीतून मुलींसाठी शिक्षणाचे द्वार पुण्यात खुले केले. तरीही अजूनसुद्धा बहुजन समाज अंधश्रद्धेच्या चिखलातच बरबटलेला आहे, गुरफटलेला आहे. अशा प्रकारे त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सदर प्रसंगी शालेय विद्यार्थ्यांमधून पायल गरुड, आरोही लोट, दिव्यानी साळुंखे, वैशाली अहिरे ,गायत्री गरुड, भाग्यश्री जगताप, नीलिमा चौधरी, कोमल पाटील, मनस्वी भोई, तनस्वी भोई, ऋषिका भिल, राज पारधी, हेमंत मांडोळे, रिया धनगर, तेजश्री धनगर, समर्थ धनगर, कार्तिक धनगर, भूषण लोहार, भूषण पवार, आदी विद्यार्थ्यांनी शिक्षकाची भूमिका कशी आणि का ? याचे स्वानुभव घेऊन कामकाज बघितले. सदर प्रसंगी पायल मनोज गरुड या सातवीच्या विद्यार्थिनीने मुख्याध्यापक पदाचा अनुभव घेतला. इतर विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या भूमिका पार पाडल्या .सदर प्रसंगी कार्यक्रमाच्या यशस्वी तयारीसाठी सुषमा तेले मॅडम, भारती चव्हाण मॅडम ,अर्चना महाजन मॅडम, वंदना जाधव मॅडम, छाया निकम मॅडम, यांनी मोलाचे सहकार्य केले.तसेच सदर प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून डी. ए .सोनवणे सर हे होते .आणि शिक्षक व्ही. डी .पाटील, ए.पी. जाधव, वाय. जे .पाटील, उपस्थित होते. इयत्ता नमस्ते 7 वी च्या प्रतीक्षा कुंभार व पलक फतरोड या विद्यार्थ्यांनी पी.एम. ठाकरे सर व डी.ए. सोनवणे सर यांच्यासाठी आकर्षक ग्रीटिंग कार्ड तयार करून भेट म्हणून दिले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अशोक सैंदाणे यांनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *