• Tue. Jun 17th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ भव्य चित्रकला स्पर्धेला उस्फूर्त प्रतिसाद

Sep 17, 2024

Loading

सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ भव्य चित्रकला स्पर्धेला उस्फूर्त प्रतिसाद

गणेश उत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थी व पालकांच्या सहकार्याने समाजामध्ये ट्रॅफिक सेन्स व पर्यावरण संवर्धन बाबतीत जनजागृती करण्याचा प्रयत्न.: वरूण पाटील

ठाणे: कल्याण( मनिलाल शिंपी)कल्याण शहर सार्वजनिक गणेश उत्सव महामंडळ आयोजित आंतर शालेय भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन कल्याण पश्चिम येथील मंगेशी हॉल येथे आयोजित करण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या कल्पक सृजन व सौंदर्यदृष्टीला हक्काचा व्यासपीठ देण्यासाठी ही सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आली होती. बाल मनातील गणपती बाप्पाचा आढळ अस्तित्व, गणपती बाप्पा सोबत असलेले त्यांचे मित्रत्व आणि पर्यावरण संवर्धनाविषयी त्यांच्या मनात बिजांकुर रुजवण्याच्या दृष्टीने व भविष्यातील वाहतूक नियमांचे पालन करणारी पिढी घडवण्याच्या दृष्टीने कल्याण शहर सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष श्री वरून पाटील यांच्यासह विनोद शेलकर, उमाकांत चौधरी, मंगेश बनकर यांच्यासह आर एस पी अधिकारी युनिटचे नवी मुंबई ठाणे विभागाचे प्रमुख दिलीप स्वामी, ठाणे मुंबई पालघर नाशिक विभागीय आर एस पी कमांडर डॉक्टर मणिलाल शिंपी, यांच्या उपस्थितीत स्पर्धा आनंदात आणि उल्हासात संपन्न झाली. या चित्रकला स्पर्धेला 375 स्पर्धकांनी उत्कृष्ट प्रतिसाद दिला. स्पर्धाप्रमुख आर एस पी अधिकारी विनोद शेलकर यांनी काम पाहिले. उमाकांत चौधरी व मंगेश बनकर यांच्या संयोजनानुसार कला अध्यापक तसेच आरएसपी अधिकारी भिवंडी ग्रामीणचे प्रमुख श्री मंगेश भामरे, आर एस पी अधिकारी श्री केशव मालुंजकर, आर आर भोकनळ, सचिन मालपुरे, कळवा मुंब्रा विभागाचे समादेशक संजय खैरनार, भगवान माळी, यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच या स्पर्धेचे नियंत्रक म्हणून जाणीव सामाजिक संस्थेचे अध्यक्ष श्रीमती सौ अश्विनी मिस्तरी, श्री भगवान माळी, मंगेश भामरे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. मॉडेल कॉलेजचे फिजिकल डायरेक्टर, आर एस पी अधिकारी सुभाष गायकवाड यांच्यासह मॉडेल कॉलेजच्या एनसीसी युनिटचे छात्र सैनिक कु. श्रुती गमरे, कोमल केसुरे, यांनी स्वयंसेवक म्हणून चित्रकला स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. या स्पर्धेसाठी कल्याण शहरातील शाळा व विद्यार्थ्यांच्या पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला व चित्रकला स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले.सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ भव्य चित्रकला स्पर्धेला उस्फूर्त प्रतिसाद

कल्याण शहर सार्वजनिक गणेश उत्सव महामंडळ आयोजित आंतर शालेय भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन कल्याण पश्चिम येथील मंगेशी हॉल येथे आयोजित करण्यात आले होते. कल्याण शहर सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष श्री वरून पाटील यांच्यासह विनोद शेलकर, उमाकांत चौधरी, मंगेश बनकर तसेच आर एस पी अधिकारी युनिटचे नवी मुंबई ठाणे विभागाचे प्रमुख दिलीप स्वामी, ठाणे मुंबई पालघर नाशिक विभागीय आर एस पी कमांडर डॉक्टर मणिलाल शिंपी, यांच्या उपस्थितीत स्पर्धा आनंदात आणि उल्हासात संपन्न झाली. या चित्रकला स्पर्धेला 478 स्पर्धकांनी उत्कृष्ट प्रतिसाद दिला. स्पर्धाप्रमुख आर एस पी अधिकारी विनोद शेलकर यांनी काम पाहिले. उमाकांत चौधरी व मंगेश बनकर यांच्या संयोजनानुसार कला अध्यापक तसेच आरएसपी अधिकारी भिवंडी ग्रामीणचे प्रमुख श्री मंगेश भामरे, आर एस पी अधिकारी श्री केशव मालुंजकर, आर आर भोकनळ, सचिन मालपुरे, कळवा मुंब्रा विभागाचे समादेशक संजय खैरनार, भगवान माळी, यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच या स्पर्धेचे नियंत्रक म्हणून जाणीव सामाजिक संस्थेचे अध्यक्ष श्रीमती सौ अश्विनी मिस्तरी, श्री भगवान माळी, मंगेश भामरे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. मॉडेल कॉलेजचे फिजिकल डायरेक्टर, आर एस पी अधिकारी सुभाष गायकवाड यांच्यासह मॉडेल कॉलेजच्या एनसीसी युनिटचे छात्र सैनिक कु. श्रुती गमरे, कोमल केसुरे, यांनी स्वयंसेवक म्हणून चित्रकला स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. या स्पर्धेसाठी कल्याण शहरातील शाळा व विद्यार्थ्यांच्या पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला व चित्रकला स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले.

चित्रकला स्पर्धेसाठी, गणपती बाप्पा, माय फ्रेंड गणेशा, पर्यावरण संवर्धन व वाहतूक ट्रॅफिक सेन्स या त्या माध्यमातून जनजागृती करून एक सुजान आणि सुसंस्कृत नागरिक घडवणे या उद्देशाने या विषयावर लक्ष केंद्रित करण्यात आले होते.

चित्रकला स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मोलाचे सागर भालेकर, सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे संस्थापक, राजाभाऊ सावंत, श्री विजय कडव, किरण गायकवाड, सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाच्या माजी अध्यक्ष कांचनताई कुलकर्णी यांनीही मोलाचे सहकार्य केले.

स्वामी विवेकानंद विद्यामंदिर दत्तनगर शाळेत विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव उत्साहात. अवांतर वाचन करून आपल्या ज्ञानात भर टाका :: गीतांजली मुणगेकर .
ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यातील शिक्षकांच्या प्रलंबित समस्या तातडीने सोडवण्यासाठी बैठक संपन्न. *मुंबई विभाग शिक्षण उपसंचालकांनी वरील तीन जिल्ह्यातील शिक्षकांचा समस्या तातडीने सोडवाव्यात-शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे.*
सद्गुरु दौलत बाबा यांनी परिसरात अध्यात्मिक ऊर्जा निर्माण केली….. ज्येष्ठ समाजसेवक प्रवचनकार हिंदू रत्न डॉक्टर रवींद्र भोळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *