महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा दल व नागरी संरक्षण संघटन नागपूर अंतर्गत, ठाणे पालघर विभागीय संपर्क कार्यालयाचे उद्घाटन संपन्न.
*ठाणे जिल्ह्यातील आर एस पी युनिटचे कार्य कौतुकास्पद आणि अभिनंदनीय आहे. पोलीस विभागाचे कायम सहकार्य राहील: सुधाकरराव यादव*
ठाणे: कल्याण ( प्रतिनिधी)दिनांक 22 सप्टेंबर 2024 रोजी, महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा दल व नागरी संरक्षण संघटन नागपूर अंतर्गत, संघटनेचे अध्यक्ष आदरणीय संजयजी शेंडे, उपाध्यक्ष श्री. पी एस महाजन, व सर्व पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली, श्रीमती डी.डी.ठाकरे सामाजिक व शैक्षणिक संस्था संचलित, ई-मेल म्हात्रे व्यवसायिक महाविद्यालय, के आर मालदे इंग्लिश स्कूल रांजणोली तालुका भिवंडी जिल्हा ठाणे या ठिकाणी,मुंबई, रायगड,ठाणे पालघर विभागाचे आर एस पी अधिकारी शिक्षक युनिट चा संपर्क कार्यालयाचे कोनगाव वाहतुक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री सुधाकराव यादव साहेब,यांचा हस्ते, श्रीफळ वाहून कोनगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. नेताराम मस्के साहेब, महाराष्ट्र राज्य आर एस पी चे कायदेविषयक सल्लागार ऍड. डॉ.के. डी.पाटील, ठाणे नवी मुंबई नाशिक बाजार विभागाचे विभागीय आर एस पी समादेशक श्री.दिलीप स्वामी, डॉ. मनिलाल शिंपी, एम एच म्हात्रे महाविद्यालयाचे प्राचार्य श्री सचिन ठाकरे सर, स्पोर्ट्स डायरेक्टर डॉ. शिंपी सर,अहमदनगरचे जिल्हा समादेशक डॉ.सोमनाथ बोंतले,कल्याण डोंबिवली, उल्हासनगर विभागीय समादेशक श्री.महादेव क्षीरसागर, ठाणे जिल्हा अतिरिक्त समादेशक श्री.जितेंद्र सोनवणे, कल्याण डोंबिवली समादेशक श्री.अनंत किनगे, यांच्या प्रमुख उपस्थिती कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. विभागीय कार्यालयाच्या ठिकाणी बालसैनिक मेळावा, आर एस पी शिक्षक व शिक्षण, व कार्यालयीन कामकाजासाठी या कार्यालयाच्या संस्थेच्या माध्यमातून आर एस पी च्या उपक्रमांसाठी कायम सहकार्य राहील असेही शाळेचे व महाविद्यालयाचे प्राचार्य श्री.सचिन ठाकरे, अडमिंन श्री रुपेश तरे, यांचा सह शाळेचे व महाविद्यालयाचे स्पोर्ट्स डायरेक्टर डॉ. मनिलाल शिंपी यांनी यावेळी सांगितले. संस्थेचे संस्थापक आदरणीय करसन ठाकरे साहेब यांनीही आर एस पी युनिट च्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.