• Wed. Jun 18th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये नवरात्रि उत्सव उत्साहात साजरा

Oct 12, 2024

Loading

ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये नवरात्रि उत्सव उत्साहात साजरा

चोपडा येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित ऑक्सफर्ड इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये नवरात्रीनिमित्त पूर्व प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांसाठी तसेच इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी गरब्याचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरूवात दीपप्रज्वलन करून करण्यात आली. याप्रसंगी प्रमुख पाहुण्या लिना पाटील, शाळेची माजी विद्यार्थीनी खूशी पाटील, मुख्याध्यापिका ममता कपिल न्याती, समन्वयक अश्विनी पाटील, दिपाली पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून तसेच अंबेमातेचे पूजन करून करण्यात आली. याप्रसंगी शाळेतील शिक्षक कपिल पाटील यांनी मुलांना नवरात्री विषयी माहिती सांगितली . त्यानंतर नृत्य शिक्षिका दिपाली पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी छान सामुहिक गरबा नृत्य सादर केले. सर्व विद्यार्थी रंगबिरंगी पारंपरिक वेशभूषा करून नृत्यामध्ये सहभागी झाले होते .
शाळेतील गरबा स्पर्धेत प्रत्येक इयत्तेतून दांडिया किंग आणि क्वीन निवडण्यात आले. यात इयत्ता पहिली : १) मनुश्री पाटील २) वेदांत सोनवणे, इयत्ता दुसरी :
१) स्वरा पाटील 2) तनक्ष माळी, इयत्ता तिसरी : १) प्रिशा पवार २) सानिध्या सारस्वत, इयत्ता चौथी : १) स्मित पाटील २) गार्गी कुमावत, इयत्ता पाचवी : १) विहान राठोड २) रीत मलानी ३) खुशी बाहेती, इयत्ता सहावी : १) मानवी गेही २) चैतन्य शिरसाठ, इयत्ता सातवी : १) स्वरा पाटकर २)नैतिक पाटील, इयत्ता आठवी : १) वेद अग्रवाल २) पलक बाहेती 3) पुरंदरी करंदीकर, इयत्ता नववी : १) यश सोनवणे २)ध्रुवी पाटील, इयत्ता दहावी : 1) दिवेश खाचणे २) लक्ष्मी महाजन ३) सृष्टी सैंदाणे या विद्यार्थ्यांचा समावेश होता.
पूर्व प्राथमिक विभागाने नवरात्री अनोख्या पद्धतीने साजरी केली. रावण दहनाचा कार्यक्रम या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आला होता. राम, लक्ष्मण, सीता आणि हनुमान यांच्या वेशभूषेमध्ये विद्यार्थी या कार्यक्रमात सहभागी झाले होते. रामाच्या वेशातील विद्यार्थ्याने रावण दहन केले.
पूर्व प्राथमिक विभागाच्या शिक्षिका माधुरी पाटील, गायत्री पाटील, शितल भावसार, वैशाली सोनवणे, करुणा पाटील आणि रुपाली धनगर यांनी या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले. .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षिका कल्याणी चव्हाण यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका ममता कपिल न्याती यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *