लासूर येथील महिलांसाठी श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने
सामान्य ज्ञान स्पर्धा संपन्न,
क्रांतिज्योती सावित्रीआई फुले व राजमाता जिजाऊ यांच्या संयुक्त जयंती निमित्त उपक्रम
लासूर येथील महिला भगिनी व विद्यार्थीनी यांच्या साठी विवाहित महिला गट व अविवाहित मुलीचा गट अश्या दोन गटात क्रांतिज्योती सावित्रीआई फुले व राजमाता जिजाऊ यांच्या संयुक्त जयंती निमित्त त्यांच्या जिवन कार्यावर आधारित सामान्य ज्ञान परीक्षा चे आयोजन श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष जितेंद्र महाजन यांचे वतीने करण्यात आले होते सदर स्पर्धा १५ डिसेंबर २०२४ रविवार रोजी माळी समाज मंगल कार्यालय लासूर येथे संध्याकाळी ४:३० ते ५:३० या वेळेत पार पडली सदर स्पर्धेत दोन्ही गटातील ९० महिला व मुलींनी सहभाग घेतला असून परीक्षा शांततेत संपन्न झाली.
त्याप्रसंगी क्षत्रिय माळी समाज सुधारणा मंडळ महाराष्ट्र गुजरात मध्यप्रदेश चे अध्यक्ष ए के गंभीर सर, संत सावता महाराज पतसंस्थेचे चेअरमन कैलास महाजन सर, संचालक एच एच माळी सर आदी उपस्थित होते.
सदर स्पर्धेत विवाहित गटासाठी बक्षीस प्रथम पारितोषिक रु २५००/- किंमतीची पैठणी साडी संत सावता महाराज पतसंस्थेचे चेअरमन कैलास शालिग्राम महाजन सर यांचे कडून, तर द्वितीय पारितोषिक रु १८००/- किंमती चा प्रेशर कुकर संत सावता महाराज पतसंस्थेचे व्हा.चेअरमन जागृती राजेंद्र महाजन यांचे कडून, व तृतीय पारितोषिक रु.१३००/- रु किमती चा ५ डब्याचा (स्टील) चा सेट जि. प. शाळा व्यवस्थापन समिती माजी अध्यक्ष नंदलाल सीताराम माळी यांचे कडून तसेच उत्तेजनार्थ पारितोषिक ५ स्पर्धकांना भेटवस्तू चोपडा तापी सहकारी सूतगिरणी चे संचालक अमृतराव वाघ यांचे कडून देण्यात येत आहे.
तसेच अविवाहित गटासाठी बक्षीस प्रथम पारितोषिक रु २५००/- किंमतीची पैठणी साडी संत सावता महाराज पतसंस्थेचे संचालक मा.श्री एच एच माळी सर यांचे कडून, द्वितीय पारितोषिक रु १८००/- किंमती चा प्रेशर कुकर लासूर किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक मा.श्री सुरेश पवार यांचे कडून, व तृतीय पारितोषिक रु.१३००/- रु किमती चा ५ डब्याचा (स्टील) चा सेट SBI ग्राहक सेवा केंद्राचे संचालक मा.श्री निलेश ज्ञानेश्वर राजकुळे व सोनल निलेश राजकुळे यांचे कडून तसेच उत्तेजनार्थ पारितोषिक ५ स्पर्धकांना भेटवस्तू चोपडा तापी सहकारी सूतगिरणी चे संचालक अमृतराव वाघ यांचे कडून देण्यात येत आहे व सहभागी सर्व महिला भगिनी व विद्यार्थीनीना प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत तसेच प्रथम सहभाग घेणारे १०० स्पर्धकांना अभ्यासासाठी ५० स्पर्धकांना लासूर येथील माजी लोकनियुक्त सरपंच जनाताई सुकदेव माळी व ५० स्पर्धकांना कुरवेल ग्रामपंचायत चे ग्राम पंचायत अधिकारी(ग्रामसेवक) श्री.एस. पी.निनायदे यांचे कडून मोफत देण्यात आली होती.
सदर स्पर्धा यशस्वीतेसाठी परीक्षा समन्वयक ए वन क्लासेस चे संचालक राहुल पाटील सर, सह संचालक यश महाजन सर, सरस्वती क्लासेस चे संचालक विनोद महाजन सर यांनी काम पाहिले तसेच स्पर्धा यशस्वीतेसाठी युवक संघाचे पदाधिकारी प्रेमराज शेलकर, योगेश माळी, आर डी महाजन,नंदलाल माळी यांनी परिश्रम घेतले.