निंबा येथे २१ रोजी मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबीर
लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ व दमाणी नेत्र रूग्णालयाचा उपक्रम
अकोला- गेल्या आठ वर्षापासून समाजातील गोरगरीब रूग्णांसाठी तपासणी आणि मोफत दृष्टीदानाचा उपक्रम राबविणाऱ्या पत्रकार व सामाजिक समुहाच्या लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेकडून निंबा,अंदुरा,लोहारा परिसरातील रूग्णा़साठी २१ जानेवारी २०२५ रोजी मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. दृष्टीदानाच्या कार्यात गेल्या अनेक वर्षापासून उल्लेखनिय सेवा कार्य बजावणाऱ्या अकोला येथील दमाणी नेत्र रूग्णालयाच्या सौजन्न्याने तथा रोटरी क्लब ऑफ बॉम्बे हॕंगीग गार्डन, मुंबई यांचे सहकार्याने हा संयुक्त उपक्रम राबविण्यात येत आहे.यामध्ये ज्यांची खाजगीमध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रिया करून घेण्याची क्षमता नाही अशा आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील रूग्णांच्या मोतीबिंदू तपासण्या करण्यात येणार आहेत. त्यानंतर दिलेल्या वेळापत्रकानुसार पात्र रूग्णांच्या दमाणी नेत्र रूग्णालय,आपातापा रोड, अकोला येथे मोतीबिंदूंच्या मोफत शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत.दमाणीचे नेत्रतज्ञ डॉ.मनिष हर्षे (एम.एस.) व नेत्र तंत्रज्ञ डॉ.दत्ता पवार हे तज्ञ डॉक्टर्स यावेळी रूग्णतपासणी करणार आहेत.
मारोती संस्थान निंबा येथे आयोजित या शिबीराला बाळापूरचे आमदार नितीनबाप्पू देशमुख हे उद्घाटक तर अध्यक्ष म्हणून उपविभागीय अधिकारी अनिरूध्द बक्षी उपस्थित राहणार आहेत.अकोल्यातील निर्माण ग्रूपचे संस्थापक- अध्यक्ष गणेशराव देशमुख व दमाणी नेत्र रूग्णालयाचे मुख्य व्यवस्थापक सभापती शुक्ल हे या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी असणार आहेत. लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे संस्थापक- राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम.देशमुख(निंबेकर),उरळचे पोलिस उपनिरीक्षक गोपाल ढोले,जि.प.सदस्या सौ.मिनाताई बावणे,पंचायत समिती सदस्या सौ.अर्चनाताई देशमुख,सरपंचा सौ.ज्योतीताई सोनोने,पोलिस पाटील प्रमोदराव देशमुख यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या शिबीरासाठी रूग्ण नोंदणी शुल्क रू.३० राहणार असून नोंदणी सकाळी ९.०० वाजतापासून शिबीर स्थळावरच सुरू होणार आहे.यावेळी शस्त्रक्रियेसाठी पात्र रूग्णांना रक्त,लघवी तपासणी व भुलीकरणासाठी रू.३०० शिबीर स्थळावरच भरावे लागणार आहेत.यावेळी गरजू रूग्णांना जवळचे चष्मे रू.१०० मध्ये दिले जाणार आहेत. या संधीचा जास्तीत जास्त रूग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन लोकस्वातंत्र्य संस्थापक- राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम.देशमुख (निंबेकर),उपाध्यक्ष प्रदिप खाडे,किशोर मानकर, सचिव राजेन्द्र देशमुख, डॉ.अनुपकुमार राठी,पुष्पराज गावंडे, प्रा. राजाभाऊ देशमुख,प्रा.डॉ.संतोष हुशे,अॕड.राजेश जाधव,सौ.जया भारती,अंबादास तल्हार व जिल्हाध्यक्ष,पंजाबराव वर सागर लोडम,सतिश देशमुख,मनोहर मोहोड,दिलीप नवले व पत्रकार महासंघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी तथा सरपंचा ज्योतीताई सोनोने,पोलिस पाटील प्रमोदराव देशमुख,गणेश देशमुख,प्रा.मंदार देशमुख, डॉ.अमित देशमुख, डॉ.प्रशांत मांगुळकर, डॉ.गोविंद ठोकणे, डॉ.देवीदास मास्कर गोपालदास चितलांगे,ज्ञानेश्वर कोरडे व युवा कार्यकर्त्यांनी केले आहे.
============================