योगेश्वर माध्यमिक विद्यालयात साजरा झाला माजी विद्यार्थ्यांचा भव्य स्नेहसंमेलन – 25 वर्षांनी एकत्र येण्याचा आनंद!
अमळनेर प्रतिनिधी(जगदीश पाटील सर)
आज, 23 मार्च 2025, रविवार रोजी योगेश्वर माध्यमिक विद्यालय, डांगर बुद्रुक येथे सन 1999, 2000, 2001, आणि 2002 च्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचं स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले. या स्नेहसंमेलनात सर्वत्र खेळीमळीचं वातावरण पसरलं होतं, जिथे माजी विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजनांचे आभार मानले आणि त्यांच्या यशामध्ये गुरुजनांचा मोठा वाटा आहे हे मनःपूर्वक अनुभवांसह व्यक्त केले.
कार्यक्रमात सहभागी झालेल्या माजी विद्यार्थ्यांनी नासिक, मुंबई, पनवेल, सुरत आणि संभाजीनगर यांसारख्या ठिकाणांहून येऊन उपस्थिती दर्शवली. विशेषत: *लोंढवे* येथून डांगर शिक्षण केंद्राकडे येणाऱ्या विद्यार्थ्यांनी ही भव्य संधी मोठ्या आनंदाने स्वीकारली. काही विद्यार्थ्यांना 25 वर्षांनंतर एकमेकांशी भेटण्याचा आनंद झाला.
या विशेष कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सेवानिवृत्त शिक्षक आर. जी. भामरे सर यांनी भूषविले, तर श्री. जे एस पाटील, श्री. डी के खैरनार, श्री. एस एच भोसले, श्री. डी बी पाटील, श्री. डी जी वाणखेडकर, योगेश्वर माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. एस व्ही पाटील, श्री देसले सर, श्रीमती वैशाली पाटील मॅडम, श्री विजय पाटील, आणि श्री हर्षल पवार सर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री व्ही ए पाटील सर यांनी केले, आणि यावेळी सुरुची भोजनाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन आणि उत्कृष्ट नियोजन डांगर येथील श्री सतीश पाटील, श्री जितेंद्र पाटील, श्री राहुल पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केले.
या स्नेहसंमेलनाने एकत्र येण्याच्या आनंदाचा अनुभव घेताना जुन्या आठवणींना उजाळा दिला, ज्यामुळे सर्व उपस्थितांची हृदयात एक विशेष स्थान मिळविले.