**आण्णासाहेब हरीश मराठे यांचा वाढदिवस: ज्ञान, संस्कार आणि समाजसेवेचा आदर्श**
ज्ञानाने माणूस मोठा होतो; पण ज्ञानाला संस्काराची जोड मिळाली तरच माणुसकीचा व माणसातील माणूसपणाचा एक चांगला आविष्कार पहावयास मिळतो. या तत्त्वाचे ज्वलंत उदाहरण म्हणजे आण्णासाहेब हरीश मराठे.
कळमसरे गावात वीज मंडळात नोकरी निमित्ताने स्थायिक झालेले आण्णासाहेब हरीश मराठे, सर्वांच्या मनात आणि हृदयात एक विशेष स्थान निर्माण करण्यात यशस्वी झाले आहेत. त्यांच्या कार्यातून समाजहिताचा विचार आणि समाजसेवेची गोडी स्पष्टपणे व्यक्त होते.
आण्णांच्या परिवारावर पत्नी अनिता ताईंचे अचानक जाणं दुःख व संकटाचे एक मोठं कारण बनलं. तरी त्यांनी हृदयात दुःख ठेवून आपल्या मुलाला आणि दोन्ही मुलींना धीर दिला. शिक्षण, संस्कार आणि शिस्त या बाबींवर त्यांची विशेष लक्ष केंद्रित करून त्यांनी आपल्या मुलांना योग्य संस्कारांचे बाळकडू दिले.
महिला सशक्तीकरणाच्या पातळीवर ताईसाहेब कै. अनिता मराठे यांनी पंचायत समितीच्या सभापती पदावर विराजमान झाल्यानंतर गटाच्या विकासासाठी नेहमीच प्राधान्य दिलं. अण्णांनी कळमसरे गावात मित्रांचा मोठा गोतावळा निर्माण केला..
या वाढदिवसाच्या निमित्ताने आण्णासाहेब हरीश मराठे यांच्या कार्य हे वाखाणण्याजोगे
आहे. त्यांनी नोकरी करत समाज कार्याला प्राधान्य दिले. कळमसरे गावामध्ये नवसाचा गणपती मंदिराची मुहूर्तमेढ मित्रांच्या सहकार्याने रोवली आहे. त्याचप्रमाणे कळमसरे येथील तरुणांना व्यायाम करण्याच्या सुयोग्य सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी व्यायाम शाळा निर्माण केली. या शाळेत आवश्यक साहित्यही दिले आहे, ज्यामुळे या तरुणांचा आरोग्य विकास होतो.
दिवाळीच्या वेळेस, तळागाळातील गोरगरीबांना फराळाचे वाटप करण्यात आण्णासाहेब हरीश मराठे नेहमी आघाडीवर राहातात. त्यांच्या कार्याने समाजाच्या विस्थापित घटकांची उन्नती झाली आहे.
आण्णा साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने, आमच्या शुभेच्छा त्यांच्यासाठी आहेत:
तुमच्या आनंदाची फुलं सदैव बहरलेली असावीत,
आणि एकंदरीत तुमचे आयुष्यच एक अनमोल आदर्श बनावे!
ईश्वर तुम्हांस दीर्घायुष्य देवो व आपल्या आयुष्यात तुम्हांस हवे ते मिळो.
आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
**शुभेच्छुक,**
श्री ईश्वर आर. महाजन
पत्रकार, अमळनेर
9860352960