• Wed. Jun 18th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान अंतर्गत अमळनेरात दीड हजार नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग शिवार भागातील नागरिकांसाठी जोरदार समाधान शिबीर; मा. आमदार अनिल पाटील व खासदार स्मिताताई वाघ यांच्या हस्ते प्रमाणपत्र व धनादेशाचे वितरण

Jun 13, 2025

Loading

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान अंतर्गत अमळनेरात दीड हजार नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

शिवार भागातील नागरिकांसाठी जोरदार समाधान शिबीर; मा. आमदार अनिल पाटील व खासदार स्मिताताई वाघ यांच्या हस्ते प्रमाणपत्र व धनादेशाचे वितरण

अमळनेर प्रतिनिधी
महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग, मंत्रालय मुंबई यांचेकडील दि. 25 मार्च 2025 च्या शासननिर्णयानुसार छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान गतिमान प्रशासन तथा आपत्कालीन व्यवस्थेचे बळकटीकरण या योजनेंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानांतर्गत ” मारवड मंडळ भागातील मारवड, शहापूर, कळमसरे, प्र डांगरी, निम व करणखेडा या गावातील नागरिकांसाठी दिनांक 13/06/2025 (वार शुक्रवार) रोजी जिल्हा परिषद केंद्रिय प्राथमिक मुलांची शाळा, मारवड ता. अमळनेर येथे शिबीराचे आयोजन करण्यात आले. या शिबीराचे उदघाटन मा. आमदार दादासो. अनिल भाईदास पाटील यांचे हस्ते करण्यात आले. तसेच सदर शिबीरास प्रमुख पाहुणे मा. खासदार ताईसो. स्मिताताई वाघ यांनी भेट देवून सर्वसामान्य नागरिकांशी संवाद साधला.
सदर शिबीरात मा. उपविभागीय अधिकारी अमळनेर श्री. नितीनकुमार मुंडावरे, तहसिलदार अमळनेर श्री. रुपेशकुमार सुराणा, तालुका कषी अधिकारी आधार संस्था, तसेच तालुका स्तरावरील सर्व कार्यालये यांचे अधिकारी/कर्मचारी उपस्थित होते. श्री. एल जी चौधरी यांनी सुत्रसंचालन केले प्रत्येक विभागाने स्वतः उपस्थित राहून आपआपल्या विभागाचे स्टॉल लावून मंडळ भागातील सर्व गावातील सर्वसामान्य जनता, शेतकरी, ज्येष्ठ नागरिक, विदयार्थी व महिला यांचे शासकीय विभागांशी संबंधित तक्रारींचे / समस्यांचे निराकरण करुन वंचित लाभार्थीना मा. आमदार दादासो. अनिल भाईदास पाटील यांचे हस्ते प्रमाणपत्र/धनादेशाचे वाटप करण्यात आले. उक्त शिबीरात खालील कार्यालयांकडून लाभार्थ्यांना लाभ देण्यात आले.
67- नवीन शिधापत्रिका, दुबार शिधापत्रिका,
2संगायो शाखा तहसिल कार्यालय अमळनेर
,3 राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य धनादेश वाटप
,265 – डीबीटी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
3 निवडणुक शाखा तहसिल कार्यालय अमळनेर,12- नवीन लाभार्थी यांचे अर्ज भरुन घेण्यात आले.13- नवीन मतदारांकडून नमुना 6 भरुन घेण्यात आला.4 सेतु शाखा तहसिल कार्यालय अमळनेर 2- स्थलांतरीत मतदारांकडून नमुना 8 भरुन घेण्यात आला.
175- उत्पन्नाचे दाखले वितरण,24- रहिवासी प्रमाणपत्र वितरण,75- जातीचे दाखले वितरण
22- आधार नोंदणी,72- आधार दुरुस्ती,7 पंचायत समिती अमळनेर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण हमी योजनेतून 25- सिंचन विहीर प्रशासकीय मान्यता,10- गोठा शेड प्रशासकीय मान्यता,34- जलतारा प्रशासकीय मान्यता
सदर शिबीरात अंदाजे 600 ते 700 लोकांनी उपस्थिती नोंदवून समाधान शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. श्री. गौरव शिरसाठ, मंडळ अधिकारी टाकरखेडा भाग यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *