• Tue. Jun 17th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

आर्य गुरुकुल विद्यालयात जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न. स्वरक्षणासाठी देशाच्या रक्षणासाठी शालेय विद्यार्थ्यांना बॉक्सिंग चे प्रशिक्षण देणे आवश्यक आहे.:: महादेव क्षिरसागर

Dec 4, 2022

Loading

आर्य गुरुकुल विद्यालयात जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न. स्वरक्षणासाठी देशाच्या रक्षणासाठी शालेय विद्यार्थ्यांना बॉक्सिंग चे प्रशिक्षण देणे आवश्यक आहे.:: महादेव क्षिरसागर ठाणे कल्याण ( मनिलाल शिंपी )::कल्याण डोंबिवली महानगरपालिका कला व क्रिडा सांस्कृतिक विभाग. शासनाच्या आंतर शालेय जिल्हा स्तरिय बॉक्सिंग स्पर्धा 2022 . आर्य गुरुकुल विद्यालयात क्रीडा समिती सदस्य ज्येष्ठ क्रीडा प्रशिक्षक मुख्याध्यापक महादेव क्षीरसागर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.मुलींच्या स्पर्धेची सुरवात श्री स्नेहा करपे सहआयुक्त कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्रिडा व सांस्कृतिक विभाग यांच्या हस्ते करण्यात आली. व त्यांनी खेळाडू ना शुभेच्छा देऊन मार्गदर्शन केले.

यावेळी आर्य गुरुकुल विद्यालयाचे ट्रस्टी व स्पोर्ट डायरेक्टर दीपक वर्मा, बिर्ला महाविद्यालयाचे क्रीडा संचालक यज्ञेश्वर बारगाव, आणि क्रीडा समिती सदस्य कृष्णा माळी यांच्या प्रमुख उपस्थितीत बॉक्सिंग स्पर्धांना सुरुवात करण्यात आली.सदर बॉक्सिंग स्पर्धेचे आयोजन आर्या गुरुकुल शाळेने उत्कृष्ट रित्या केले. आर्या गुरुकुल चे ट्रस्टी व स्पोर्ट डायरेक्टर दिपक वर्मा व मुख्याध्यापिका राधामनी अय्यर यांच्या सहकार्याने बॉक्सिंग स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणत संपन्न झाल्या.
बॉक्सिंग स्पर्धेत 14 वर्षा खालील मुले, 17 व 19 वर्ष वयोगटातील मुले व मुली असे मिळून 60 ते 70 बॉक्सर खेळाडूंनी सहभाग नोंदविला. आर्या गुरुकुल स्कूल, होलीक्रॉस स्कूल, होलीरोझ स्कूल, रॉयल इंटरनॅशनल स्कूल, बिर्ला कॉलेज, ट्रि हाउस अश्या विविध शाळा महाविद्यालयांनी सहभाग घेतला होता. ठाणे जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे महासचिव सागर पेडणेकर स्पर्धा प्रमुख व त्याचे राष्ट्रीय, राज्य पंच श्री प्रविण सरकारले,यांचे विशेष सहकार्य लाभले. रिना माने, दिपेश धाडवे, संतोष मुंढे, सुयोग जाधव,यांनी पंच म्हणून यशस्वी कामगिरी बजावली.
बॉक्सिंग स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी , क्रीडा समिती सदस्य महादेव क्षीरसागर यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करताना सांगितले की आजच्या सभोवतालचा परिस्थितीचा विचार केला तर देश रक्षणासाठी व संरक्षणासाठी प्रत्येक शाळेत बॉक्सिंग व कराटेचे प्रशिक्षण देणे गरजेचे आहे असे सांगितले. अरे गुरुकुल शाळेचे राष्ट्रीय आणि फिजिकल डायरेक्टर दीपक वर्मा यांनी यावेळी सांगितले की कराटे बॉक्सिंग व खेळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रात आपल्या कलागुणांना पात्र ठरविण्यास मदत होत असते. यावेळी बिर्ला महाविद्यालयाचे क्रीडा संचालक यज्ञेश्वर बागराव, कल्याण डोंबिवली क्रीडा समिती सदस्य कृष्णा माळी, कृष्णा बनकर, रविंद्र देसाई, संदिप नरवडे आदी उपस्थित होते. या मान्यवरांचा उपस्थितीत बॉक्सिंग स्पर्धा यशस्वी रित्या पार पडल्या. अत्यंत उत्साहात बॉक्सर खेळाडूंनी स्पर्धेचा लढतीची सुरवात .केली. मुलींच्या स्पर्धेची सुरवात श्री स्नेहा करपे सहआयुक्त कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्रिडा व सांस्कृतिक विभाग यांच्या हस्ते करण्यात आली. व त्यांनी खेळाडू ना शुभेच्छा देऊन मार्गदर्शन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *