1 min read

तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्याला अमळनेर पोलिसांकडून अटक

Loading

तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्याला अमळनेर पोलिसांकडून अटक

अमळनेर, प्रतिनिधी- अमळनेर पोलीस ठाण्यातील पोलिस निरीक्षक श्री विजय शिंदे यांना गुप्त बातमीद्वारा मार्फत बातमी मिळाली की,शहरातील जुना पारधी वाडा भागात राहणारा राजेश ऊर्फ दादू एकनाथ निकुंभ हा शहरातील सुभाष चौक भागात हातात धारदार तलवार घेऊन दहशत माजवित फिरत आहे. त्यावरून पोहेकॉ.कपिलदेव पाटील, पोना मिलिंद भामरे, पोना लक्ष्मीकांत शिंपी, पोना सूर्यकांत साळुंखे यांना सदर इसमास ताब्यात घेण्याबाबत सूचना दिल्या, त्याप्रमाणे पथकाने राजेश ऊर्फ दादू एकनाथ निंकुंम याचा शोध घेत असतांना पटेल कॉम्प्लेक्स जवळील बोळीमध्ये एक इसम हातात तलवार घेऊन दहशत माजवित फिरत असतांना दिसला, तेव्हा त्याला पोलिस स्टाॅफने अत्यंत शिताफिने ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यात एक धारदार पात्याची स्टीलची तलवार व एक लाकडी मोठा चाकू असे साहित्य मिळून आले.
सदरील इसमाचे नाव राजेश ऊर्फ दादू एकनाथ निंकुंम रा. जुना पारधीवाडा, अमळनेर असे असून पोलीस स्टेशन गु. र. नं ५६६/२०२२ शस्त्रअधिनियमन १९५९ चे कलम ४/२५ सह मु.पो.का.क १३५प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहायक फौजदार रामकृष्ण कुमावत हे करीत आहेत.अटक झालेल्या आरोपीचा पूर्वीचा इतिहास पाहता,तो अमळनेर पोलीस स्टेशन रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे.
सदरची कामगिरी पोलीस निरीक्षक अधीक्षक श्री एस. राजकुमार सो, मा.अप्पर पोलीस अधीक्षक श्री रमेश चोपडे सो,मा उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव सो यांच्या सूचनेप्रमाणे व पोलीस निरीक्षक श्री विजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाने पोहेकॉ.कपिलदेव पाटील, पोना मिलिंद भामरे, पोना लक्ष्मीकांत शिंपी, पोना सूर्यकांत साळुंखे या पथकाने केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *