गाव कामगार पोलीस पाटील संघटनेची बैठक मालपुर येथे संपन्न

गाव कामगार पोलीस पाटील संघटनेची बैठक मालपुर येथे संपन्न
शिंदखेडा तालुक्यातील मालपुर येथे दिनांक, दहा डिसेंबर रोजी,गाव कामगार पोलीस पाटील संघटनेची बैठक मालपुर येथे संपन्न झाली यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, यांचे प्रमुख उपस्थित बैठक संपन्न झाली यावेळी, बैठकीचे प्रास्ताविक आप्पा ढीवरे यांनी, केले तर नरडाणा विभागीय अध्यक्ष नारायण गिराशे यांनी आपले मनोगत व्यक्त केले,विविध विषयांवर चर्चा करण्यात आली यात,नागपूर येथे २२ डिसेंबर रोजी होणाऱ्या हिवाळी अधिवेशनावर महाराष्ट्र राज्य गाव कामगार संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी विधानभवनावर धडक मोर्चा चे आयोजन करण्यात आले आहे यासाठी विविध विषयांवर विचारविनिमय करून त्यात विविध ठराव घेण्यात आले मोर्चेसाठी निधी संकलन करणे स्थानिक आमदारांना मोर्चेबाबत व,उपविभागीय अधिकाऱ्री तसेच पोलीस निरीक्षक यांना,निवेदन देणे याबाबत ठराव झाले यावेळी पोलीस पाटील संघटनेचे माजी तालुकाध्यक्ष शिवाजी चिंधा पाटील यांनी पोलीस पाटलांना मार्गदर्शन करताना सांगितले की पोलीस पाटलांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी पोलीस पाटील गावकामगार संघटना नेहमी तत्पर आहे यासाठी येणारे हिवाळी अधिवेशनात मोर्चाचे आयोजन करण्यात आले तरी जास्तीत जास्त पोलीस पाटलांनी अधिवेशनासाठी नागपूर येथे येण्याचे आव्हान केले यावेळी पोलीस पाटील संघटनेचे ज्येष्ठ राजेंद्र पाटील मालपुर येथील पोलीस पाटील बापू बागुल विभागीय अध्यक्ष श्रीकांत वाघ कार्याध्यक्ष डॉक्टर महेंद्र पाटील नारायण सिंग गिरासे,आप्पा ढीवरे ब्रिजेश पाटील, प्रफुल पाटील सुशील जाधव, भडने येथील पोलीस पाटील युवराज माळी जयश्री पाटील तसेच शिनखेळा तालुक्यातील,पोलीस पाटील व भगिनी उपस्थित होते