1 min read

सत्यशोधक समाज संघांतर्गत केंद्रशाळा लासूर येथे विविध स्पर्धा संपन्न,रंगभरण व सुंदर हस्ताक्षर स्पर्धेला उदंड प्रतिसाद

Loading

सत्यशोधक समाज संघांतर्गत केंद्रशाळा लासूर येथे विविध स्पर्धा संपन्न,

रंगभरण व सुंदर हस्ताक्षर स्पर्धेला उदंड प्रतिसाद

प्रतिनिधी –

जि.प.प्राथमिक मुलांची केंद्रशाळा, लासूर (ता. चोपडा ) येथे सत्यशोधक समाज संघ, जळगाव अंतर्गत रंगभरण व हस्ताक्षर स्पर्धा शनिवार दि. १० डिसेंबर, २०२२ रोजी घेण्यात आल्या.रविवार दिनांक ११ डिसेंबर २०२२ रोजी सत्यशोधक समाज संघाचे जिल्हा अधिवेशन दुसरे कुऱ्हा पानाचे तालुका भुसावळ येथे संपन्न झाले.अधिवेशनाच्या औचित्याने विजय लुल्हे जिल्हा आयोजन समिती सदस्य यांच्या कल्पनेतून महात्मा ज्योतिराव फुले यांच्या बहुजन समाजाच्या शैक्षणिक उन्नती व सामाजिक व सांस्कृतिक हक्काच्या लढ्याचे कार्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावे व सर्वार्थान प्रचार , प्रसार व्हावा.मानवी मुल्यांची जोपासना होऊन ते निर्भय देशप्रेमी व समाज सेवक व्हावे या उद्दिष्टांसाठी सत्यशोधक समाज संघाचे संस्थापक राज्याध्यक्ष,सचिव डॉ.सुरेश झाल्टे यांच्या प्रेरणेने व जिल्हा समन्वय समिती प्रमुख पी.डी.पाटील सर, अधिवेशन कार्याध्यक्ष सुधाकर बाविस्कर व प्रमोद उंबरकर यांचे अमूल्य मार्गदर्शन लाभल्याने सदरहू स्पर्धांना उदंड प्रतिसाद मिळाला.
स्पर्धा निहाय इयत्तेनुसार गुणवंत विद्यार्था पुढील प्रमाणे – सुंदर हस्ताक्षर स्पर्धा – इयत्ता ३ री : – प्रथम क्रमांक : – वनेश कुंभार द्वितीय क्रमांक – दुर्वेश माळी तृतीय क्रमांक – श्रीनिल पाटील रंगभरण स्पर्धा – इयत्ता थी : – प्रथम क्रमांक – उत्कर्ष पाटील द्वितीय क्रमांक – मनिष महाजन तृतीय क्रमांक – अमोल पाटील.पेपर्स तपासून निपक्षपातीपणे स्पर्धेचे मुल्यांकन कन्या शाळेच्या शिक्षकांनी केले.स्पर्धेच्या यशस्वितेसाठी ए.के.गंभीर सर (अध्यक्ष, क्षत्रिय माळी समाज सुधारणा मंडळ ( महाराष्ट्र, गुजराथ,मध्यप्रदेश ), लोकनियुक्त सरपंच जनाताई माळी, माजी सरपंच देविलाल बाविस्कर , जितेंद्र महाजन ( प्रदेशाध्यक्ष श्री . संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्य ), संघाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र महाजन , कैलास शिंपी,पन्नालाल कोळी, किशोर धनगड, सुनिल पाटील, उज्ज्वला देसले शिक्षकांनी अमुल्य सहकार्य केले.स्पर्धांचा निकाल मुख्याध्यापक कुमावत यांनी घोषित केला.समारंभपूर्वक विजेत्या १ ते ३ विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरीत करण्यात येईल असे त्यांनी आवर्जून सांगितले. प्रास्ताविक अनिल महाजन, सूत्रसंचलन निता दलाल व आभार प्रदर्शन सरला निकम यांनी केले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *