अमळनेर ते शेगांव महिला पायीवारीचे आयोजन…
अमळनेर ते शेगांव महिला पायीवारीचे आयोजन….
२७ डिसेंबर ते ४ जानेवारी २०२३ च्या दरम्यान महीला पायीवारी निघणार-सौ ज्योती पवार वारीप्रमुख अमळनेर
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)- अमळनेर तालुक्याचे भाविकांचे श्रध्दास्थान जी.एम सोनार नगर येथील संत गजानन महाराज मंदिर येथून 27 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 5 वाजता अमळनेर येथून महिला पायीवारी रविवारी निघणार आहे ..त्या अगोदर सकाळी पाच वाजता महाआरती होईल तरी संत गजानन महाराज परीवारातील बंधू आणि भगिनींनीं उपस्थित राहावे असे महीला पायीवारी प्रमुख ज्योतीताई पवार यांनी बोलतांना सांगितले.
महिला पायीवारीचे नियोजन खालील प्रमाणे….
२७ डिसेंबर मंगळवार २०२२
गजानन पेट्रोलियम मेहुणबारे, कल्पेश पाटील, नारायण पाटील, सतीमाता देवस्थान कु-हे ,प्रविण कंखरे
यांच्याकडून सकाळचा चहा व नाश्ताची व्यवस्था केली आहे..
दुपारचे जेवण
गोपाळभाऊ कुंभार टाकारखेडा यांच्याकडून,
दुपारचा चहा
भाऊसाहेब पाटील बिलखेडे, सौ नितल पाटील ग्रामसेविका मंगरूळ यांच्याकडून थंड पेय तर रात्रीच्या मुक्काम श्रीकृष्ण जिभाऊ राजवाडकर यांच्याकडून मुक्कामाची व जेवणाची अवस्था धरणगांव येथे केलेली आहे..
२८ डिसेंबर बुधवार २०२२
शरद येवले, विजय येवले यांच्याकडून पिंप्री येथे नाश्ता
तर दुपारचे जेवन गजानन टेन्ट हाऊस मुसळी यांच्याकडून जेवण तर दुपारचा चहा भगवान पाटील एकलग्न येथे तर प्रमोद पवार खापरखेडा यांच्याकडून गोडशेव…
तर रात्रीच्या मुक्काम साईबाबा मंदिर पाळधी येथे सुरज सुनील झवर यांच्याकडून मुक्कामाची व्यवस्था करण्यात आली आहे.
२९ डिसेंबर २०२२
अशोक चौधरी, गुलाब पाटील यांच्याकडून नाश्ता, सुरेश महाजन, ज्योती महाजन यांच्याकडून पाळधी येथे चहा
गणेश भदाणे, वैशाली भदाणे यांच्याकडून मानराज पार्कच्या समोर जळगाव येथे जेवणाची व्यवस्था तर दुपारच्या चहा जितेंद्र पाटील असोदेकर यांच्याकडून तर आदिमाया मित्र मंडळ नशिराबाद यांच्याकडून बस स्टँड जवळ मुक्कामाची व जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे.
३० डिसेंबर२०२२ शुक्रवार
विनायक डहाळे जळगाव यांच्याकडून सुनसगांव पाटाचारी जवळ नाश्ता
तर कै दगडू सूर्यवंशी कु-हे यांच्या स्मरणार्थ
दिलीप सुर्यवंशी गणेश सूर्यवंशी कुऱ्हे पानाचे येथे जेवण तर संजय प्रल्हाद पाटील भरवसकर यांच्याकडून दुपारी चहा तर गोकुळ किसन घ्यार व प्रवीण पाटील मोंढाळे यांच्याकडून मुक्कामाची व जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे.
३१ डिसेंबर शनिवार २०२२
कै.एकनाथ शिंदे विचवा, संजीव पाटील ,सोपान शिंदे यांच्याकडून विचवा येथे नाश्ता व चहा तर अजीत ढवळे यांच्याकडून थंड पे,
सुपडूभाऊ चौधरी साळशिंगी यांच्याकडून दुपारचा चहा तर पुंडलिक राऊत व विनोद चौधरी (राजुर) यांच्याकडून रात्री मुक्कामाची व जेवनाची व्यवस्था करण्यात आली आहे.
१ जानेवारी २०२३ रविवार
भगवान लोहार राजुर यांच्याकडून चहा व नाश्ता व
गणेश टावरी गजानन कृषी केंद्र एनगाव यांच्याकडून चहा व नास्ता
निलेश सरोदे यांच्याकडून घाणखेडा येथे दुपारी जेवण तर साईराम मंदिर श्री सचिन ठाकूरमल यांच्याकडून मलकापूर रोड टाँवरजवळ चहा
सारंग आढाव, अमोल आढाव यशपाल सिंग परमार यांच्याकडून मलकापूर येथे रात्री मुक्कामाची व जेवणाची व्यवस्था केली आहे..
२ जानेवारी २०२३सोमवार
कान्हाभाऊ यांच्याकडून मलकापूर येथे चहा व नास्ता राजू एनकर वाघुळ नांदुरा रोड यांच्याकडून नाश्ता, अनिल आढाव धानोरा विटाळी यांच्याकडून येथे जेवण ,अरुण पाटील सोमगिर टेन्ट हाऊस यांच्याकडून मोतीचूर लाडू
तर मारवड येथील उपक्रमशील मुख्याध्यापक एल.जे चौधरी यांच्याकडून चहा, गिरधर आप्पा ग्रामविस्तार अधिकारी यांच्याकडून गोडशेव…
तर गं.भा. समाधान गव्हाणे राहणार वडी ता. नांदुरा मुक्कामाची व जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे.
३-१-२०२३ वार मंगळवार
जनार्दन बागुल व पुनीलाल बोरसे मारवड यांच्याकडून नास्ता,
वसंतराव पाटील महादेव मंदिर लांजुळ यांच्याकडून दुपारचे जेवण ,
खंडू लांबोळे पातोंडा यांच्याकडून गोडशेव तर कैलास शिंगाणे अमळनेर जय गजानन केबल अमळनेर यांच्याकडून जलम येथे मुक्कामाची व सकाळच्या नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
४-१-२०२३ वार बुधवार
सुभाष पवार यांच्याकडून थंड पे ,बाळू पाटील संगम टेन्ट हाऊस भिलाली यांच्याकडून अल्पोपहार, आत्माराम पाटील खेरडा यांच्याकडून दुपारचे जेवण तर श्रीकृष्ण चव्हाण व सौ सरला चव्हाण यांच्याकडून शेगांव येथे चहा
तर श्री गजानन महाराज संस्था शेगाव यांच्याकडून सर्व व्यवस्था..
संत गजानन महाराज सेवा संस्था अमळनेर येथील संस्थेचे अध्यक्ष आर. बी. पवार सर व वारी प्रमुख ज्योती राजेंद्र पवार कळविले आहे की सर्व महिला गजानन भक्तांना कळविण्यात येते की अमळनेरहुन चौथ्यांदा श्रीक्षेत्र शेगाव महिला पायीवारी यावर्षी 27 डिसेंबर 2022 मंगळवार सकाळी पाच वाजता निघणार. तरी ज्या महिला भक्तांना वारीत यायचे असेल त्यांनी जीएम सोनार नगर येथील मंदिरात नावे नोंदणी करावी किंवा वारी प्रमुखांची संपर्क साधून प्रवेश घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
पाण्याची व्यवस्था राम सोलर, सतीश पाटील भिलाली तर विशेष सहकार्य संत गजानन भजनी मंडळ भिलाली, औषधोपचार डॉ जिजाबराव पाटील, रथाची व्यवस्था आनंद पाटील व रथ व पालखीची सजावट चेतन उपासनी तर अनमोल सहकार्य मातोश्री टेन्ट हाऊस अमळनेर व खंडू मास्तर विलास पाटील सबगव्हाण यांचे सहकार्य लाभले आहे सर्वांचे धन्यवाद वारी प्रमुख सौ ज्योतीताई पवार व गजानन महाराज संस्थानचे अध्यक्ष प्रा.आर.बी.पवार यांनी मानले आहेत.