कटर कॉंग्रेसी नेते स्व. माधवराव दादा
मराठे !
जळगांव जिल्हा हा कॉंग्रेसचा भरभक्कम बालेकिल्ला आहे. त्यातल्या — त्यात अमळनेर तालुका हा जिल्हयात अग्रेसर. अमळनेर तालुक्यात आजही शेकडो कट्टर कांग्रेसी घराणे आहेत. आजपर्यन्त अनेक प्रकारच्या राजकीय लाटा आल्यात आणि गेल्यात परंतु ही घराणे काल आज उदया कॉंग्रेसची होती व राहतील, त्यापैकी एक घराणे म्हणजे कै. दादासाहेब बुधा रावजी मराठे निकुंभ यांचे बुधाजी काकानंतर ती उज्जवल परंपरा त्यांचे ज्येष्ठ सुपुत्र कै. दादासाहेब माधवराव बुधाजी मराठे यांनी सांभाळली कै. माधवरावदादा मराठे हे अनेक वर्षे जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष होते. महाराष्ट्रातील अनेक जिल्हयाचे राजकीय निरिक्षकही होते. गल्लीपासून दिल्लीपर्यंतचे कॉंग्रेस नेत्याशी त्यांचे सलोख्याचे संबंध होते. महाराष्ट्राचे दोन माजी मुख्यमंत्री ना. शंकररावजी चव्हाण व ना. अशोकरावजी चव्हाण त्यांचे जवळचे नातेवाईक होते. माधवरावदादांचा दि. १९ डिसेंबर २०२२ अकरावा पुण्यस्मरण दिवस. त्यानिमित्त त्यांना समस्त मराठे-निकुंभ परिवार नातेवाईक हितचिंतक तसेच मक्सुदभाई बोहरी मित्रपरिवार व मराठे गल्ली-बोरसे गल्ली व देशमुख गल्लीतर्फे भावपूर्ण आदरांजली वाहतो. एका कट्टर कांग्रेसी नेत्यास काँग्रेसी सलाम
कै. माधवरावदादा आणि आमचे सुमारे ९० वर्षापासून कौटुंबिक संबंध आहेत. एकमेकाच्या सुख-दुःखात धावून जाणे हा आमचा स्थायीभाव. तसेच आम्ही एकाच गल्लीत राहत असल्यामुळे खुपच जवळ आलो. मी स्वतः सन १९७६ साली प्रताप कॉलेजला असतांना काँग्रेसचा राजकारणात सक्रीय झालो. एन.एस.यू. आय. चा शहराध्यक्ष युवक कॉंग्रेसचा उपाध्यक्ष, अमळनेर तालुका कॉंग्रेस सेवादल अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष राजीव गांधी ब्रिगेड, जळगांव जिल्हा कॉग्रेस कमिटीचा जनरल सेक्रेटरी व आता मुंबई काँग्रेस कमिटीचा जॉईन्ट सेक्रेटरी असा माझा ४६ वर्षाच्या काँग्रेस पक्षाच्या राजकीय प्रवास झाला. एरडोल लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार व पंतप्रधान इंदिराजी गांधी यांचे निकटवर्तीय सहकारी स्व. भाऊसाहेब के एम. पाटील यांच्या मार्गदर्शनाने मी राजकारणात आलो. माझ्या हया राजकीय प्रवासात जिल्हा स्तरावरुन माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, माजी जिल्हाध्यक्ष अख्तरअली काझी, जि.प.चे माजी अध्यक्ष आबासाहेब के डी. पाटील, शिक्षण सभापती बाळासाहेब पवार व मल्हारीनाना पाटील, समाज कल्याण सभापती बाळासाहेब दाभाडे, अमळनेरचे काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष लोटन अण्णा चौधरी, माधवरावदादा मराठे, माजी जिल्हाध्यक्ष प्रा. व्ही. जी. पाटील महाराष्ट्र युवक कॉंग्रेसचे जनरल सेक्रेटरी किशोरशेठ ललवानी आदिचा सिंहाचा वाटा आहे.
कै. माधवरावदादासोबत सन १९८० साली चिकमंगरुळ (कर्नाटक) येथील लोकसभेची पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी सुमारे १५ दिवस गेलो होतो. ती निवडणुक काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा व माजी पंतप्रधान इंदिराजी गांधी लढवित होत्या. ती निवडणुक इंदिराजींनी साडे पाच लाखाच्या मतांनी जिंकलेली होती. त्यावेळी अमळनेर तालुक्यातील सर्वश्री – बाळासाहेब दाभाडे, माधवराव मराठे, सुका बुटा चक्रवर्ती, रतन सिताराम पाटील (शिरुड) व मी (राजेंद्र सुतार ) प्रचारासाठी गेलो होतो. तो दादांच्या आयुष्यातील अविस्मरणीय प्रसंग होता. तसेच दादांचे अनेक केंद्रीय मंत्री व राज्यातील मंत्र्याचे निकटचे संबंध होते. श्री. किशोरशेठ लालवानी सोबत आम्ही अनेक पक्षाच्या जाहीर सभा व कार्यक्रमांना उपस्थिती दिलेली आहे. पक्षीय कार्यासाठी आम्ही नेहमीच मुंबई- दिल्ली येथे जात होतो. माजी केंद्रीय मंत्री ना. आनंदजी शर्मा यांच्याशी दादांचे विशेष खास संबंध होते. कै. माधवराव दादांचा जन्म के बुधाजी मराठे व कै. मंदोदरीबाई मराठे यांच्या घरात दि. १ मे १९४३ रोजी झाला. बुधाजी काकाचे वडिल फारच लवकर वारल्यामुळे बुधाजी काकांवर संपूर्ण कुटुंबाची पालन-पोषणाची मोठी जबाबदारी येऊन पडली. त्याचा केळीचा व्यवसायासाठी महाराष्ट्र, गुजरात, पंजाब, दिल्ली फिरस्तीसाठी जात असत हया कामात त्यांना माधवरावदादा पूर्ण सहकार्य करीत असत. एकीकडे व्यवसाय सांभाळून कुटुंबाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडीत यशस्वी राजकारण करीत माधवरावदादा तारेवरची कसरत करीत असत त्यांनी भावडांच्या शिक्षणासाठी स्वतःचे शिक्षण अपूर्ण ठेवले. जुनी मॅट्रीकपर्यंत त्यांचे शिक्षण झाले. परंतु त्यांनी आपल्या दोन भावांना पोलीस इन्स्पेक्टर (कै. खुशालभाऊ) व डॉक्टर (कै. निवृत्तीनाथ ) केले. तसेच दोन नंबरचे भाऊ कै. भगवानराव यांना घरच्या शेतीसाठी सर्वतोपरी सहकार्य केले. चार भाऊ व दोन बहिणी (बयाताई थाळनेर व मंगलताई बऱ्हाणपुर) यांच्यावर वडिलकीच्या नात्याने प्रेमाची व मायेची सावली दिली. माधवरावदादा व आमच्या सौ. कमल वहिनीनी संपूर्ण कुटुंबासाठी फार मोठा त्याग केलेला आहे. हे मात्र कोणीही मान्य करेल. माधवरावदादा व कमलवहिनींना दोन मुले पद्माकर उर्फ राकेश व सचिन आणि तीन मुली (रत्नाताई बऱ्हाणपुर, आशाताई कजगाव व उमाताई जळगाव) येथे आहेत. प्रत्येक जण आपआपल्या संसारात सुखी व समाधानी आहेत. मोठा मुलगा पद्माकर उर्फ राकेश हा अमळनेरात सामाजिक कार्ये करीत असून लहान मुलगा सचिन हा मुंबईत एका नामांकित मल्टीनॅशनल कंपनीत मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. सचिन यांना वडिलांसारखी सामाजिक सेवेची आवड असून ते मुंबईच्या क्षत्राीरीय सूर्यवंशी मराठा समाजाचे विद्यमान उपाध्यक्ष असून मुंबईतील अनेक एन.जी.ओ. संस्थामध्ये क्रियाशिल सदस्य आहेत. दोघे ही भाऊसुद्धा कट्टर काँग्रेसी आहेत.
माधवरावदादांचे मित्र परिवारात सर्व श्री प्रा. व्ही. जी. पाटील डॉ. रमाकांत पाटील, बाळासाहेब दाभाडे, लोटनअण्णा चौधरी, जगदीशभाई जोशी, राजेंद्र सुतार, प्रदिपभाऊ पवार ,डी जि पाटिल, जगदीशभाई जोशी, राजेंद्र सुतार, गोविंददादा मुंदडे बबन बाहेती, अशोक भटनागर, भास्कर अण्णा पाटील, सुहास राणे, संताजी आबा देशमुख, प्रभाकरदादा देशमुख किशोरशेठ लालवानी, सुरेशशेठ लालवानी, रणजितभाई शहा, सुरेश आबा अहिरराव, भिलाभाऊ सोनवणे, मुरलीधर तोताराम सोनवणे डॉ. रमेश अहिरराव, विनोदभैय्या पाटील शिवचरण दंडोरे करीमभाई सालार गफारभाई मल्लिक, डॉ. उल्हास पाटील (माजी खासदार ), उल्हास साबळे आदिचा समावेश होता. नांदुरीच्या सप्तशृंगी गडावर ते ट्रस्टी होते. संत सखाराम महाराजांचा यात्रोत्सवात त्यांचा नेहमीच सहभाग असे. त्यांचा पुतण्या श्री. संजय आनंदा मराठे है आज अमळनेर नगरपालिकेचे नगरसेवक असून मागील २० वर्षापासून निवडून येत आहेत.
सदरचा लेख मुंबई येथील मुक्त पत्रकार श्री. राजेद्र माधवराव सुतार मुळ अमळनेर वासी यांनी लिहिले आहे.
जय हिंद जय महाराष्ट्र