• Mon. Jun 16th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

अमळनेरचे खान्देशपुत्र, सहधर्मादाय आयुक्त न्या. संभाजी ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद, धर्मादाय आयुक्त, न्यास नोंदणी व वकीलांतर्फे चिखलदऱ्यातील गरजू आदिवासींना वस्त्रदान

Dec 19, 2022

Loading

अमळनेरचे खान्देशपुत्र, सहधर्मादाय आयुक्त न्या. संभाजी ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद

धर्मादाय आयुक्त, न्यास नोंदणी व वकीलांतर्फे

चिखलदऱ्यातील गरजू आदिवासींना वस्त्रदान

अमरावती- महाराष्ट्र राज्याचे धर्मादाय आयुक्त व खान्देशातील जामनेर जळगावचे सुपुत्र महेंद्र केशव महाजन साहेब यांचे शुभहस्ते अमरावती सहधर्मादाय आयुक्त व सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय अमरावती विभाग अमरावती व सार्वजनिक न्यास वकील संघ अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने समाजातील गोरगरीब घटकांसाठी चिखलदरा जिल्हा अमरावती येथे दि. 17 डिसेंबर रोजी वस्त्रदानाचा कार्यक्रम आयेाजित केला होता. या कार्यक्रमात अमरावती विभागाचे सह धर्मादाय आयुक्त संभाजी दगडू ठाकरे, मेळघाट विधानसभा मतदार संघाचे आमदार राजकुमारजी पटेल, उपधर्मादाय आयुक्त नवनाथ जगताप, सहाय्यक धर्मादाय आयुक्त रोहिणी पाठक, वकील संघाचे अध्यक्ष प्रमोद बोथरा, सार्वजनिक न्यास विभागाचे अधिक्षक पिंकी रॉय, निलेश करलुके, निरीक्षक संतोष राऊत, उमेश लुंगे, सचिन बाकल, चिखलदरा नगरपरिषदेचे नगरसेवक, वकील, परिसरातील आदिवासी बंधू-भगिनी, सार्वजनिक न्यास कार्यालयातील कर्मचारी तसेच ॲडव्होकेट निवेदिता ठाकरे, इ. मान्यवर उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्र राज्याचे धर्मादाय आयुक्त महेंद्र महाजन साहेब यांनी आदिवासी गोरगरीब व दुर्बल घटकांना मदत करण्याचे आवाहन केले.

विशेष म्हणजे खान्देशातील जामनेर जळगावचे सुपुत्र, महाराष्ट्र राज्याचे धर्मादाय आयुक्त महेंद्र केशव महाजन यांच्या मार्गदर्शन व सुचनेनुसार खान्देशच्या अमळनेर तालुक्यातील दोधवद गावचे भूमिपूत्र व सध्या अमरावती विभागाचे सहधर्मादाय आयुक्त या पदावर असलेले न्यायमूर्ती संभाजी दगडू ठाकरे आणि सार्वजनिक न्यास वकील संघ अमरावती यांनी केलेल्या आवाहनामुळे जमा झालेल्या दोन टेम्पो साड्या, ब्लँकेटस्‌, टॉवेल इत्यादींचे वाटप गरजू व गोरगरीब आदिवासी बांधवांना करण्यात आले. या स्तुत्य उपक्रमाचे परिसरात समाधान व्यक्त करण्यात आले.

 

******