• Mon. Jun 16th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

खासदार स्मिता वाघांची विद्यार्थ्यांवर पुष्पवृष्टी अनोख्या स्वागताने भारावले विद्यार्थी

Jun 16, 2025

Loading

खासदार स्मिता वाघांची विद्यार्थ्यांवर पुष्पवृष्टी

अनोख्या स्वागताने भारावले विद्यार्थी

अमळनेर (प्रतिनिधी):-
येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित जी.एस.हायस्कूल व र.सा.पाटील प्राथमिक विद्यामंदिरात शाळा सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी १६ जून रोजी खासदार स्मिता वाघ यांच्या हस्ते मिठाई देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.
शाळा सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी शाळेत विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके वाटप करण्यात आली. खासदार स्मिता वाघ यांनी विद्यार्थ्यांवर पुष्पवृष्टी करून विद्यार्थ्यांचे अनोखे स्वागत केले.या अनोख्या स्वागताने विद्यार्थी व पालक भारावले. यावेळी शाळेला आकर्षक रांगोळी,तसेच फुग्यांचा सहाय्याने सजविण्यात आलेले होते.यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा होता.यावेळी खासदार स्मिता वाघ यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य संदीप पाटील,खानदेश शिक्षण मंडळाचे कार्योपाध्यक्ष नीरज अग्रवाल,जी.एस.हायस्कूल चे चेअरमन हरी भिका वाणी,संचालक योगेश मुंदडा,प्रदीप अग्रवाल,मुख्याध्यापक व्ही.एम.पाटील,उपमुख्याध्यापक ए. डी.भदाणे,प्राथमिक च्या मुख्याध्यापिका एस.पी.शिसोदे,पर्यवेक्षक एस.आर.शिंगाने, सी.एस.सोनजे,ज्येष्ठ शिक्षक एस.पी.वाघ,मुख्य लिपिक शाम पवार तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *