मुंगसे जि . प . मराठी शाळेत मुलांचे पुस्तके कपडे देऊन स्वागत
मुंगसे, ता अंमळनेर, दि १६ ( वार्ताहर ) – आज शाळेचा पहिला दिवस जि.प.प्राथ.शाळा,मुंगसे येथे इ.1लीत दाखल मुलांचे स्वागत शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रविंद्र कोळी व सदस्य, ग्राम पंचायत सरपंच, सदस्य, पत्रकार श्री.भानुदास पाटील व पालक,अंगणवाडी सेविका,मदतनीस यांच्या हस्ते गुलाब पुष्प देवून करण्यात आले.*
*शाळेच्या पहिल्या दिवशी सर्व मुला-मुलींना गणवेश व मोफत पाठ्यपुस्तक वाटप करण्यात आली.*
*कार्यक्रमासाठी सर्व विद्यार्थी,पालक,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष,सदस्य, अंगणवाडी सेविका,मदतनीस उपस्थित होते.*
* *कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक अशोक ईसे यांनी केले तर विद्यार्थी पालक यांना शाळे चे मुख्याधापक जगदिश चौधरी यांनी शाळेत प्रवेश ‘ विद्यार्थी उपस्थिती , परिसर स्वच्छ . गांवात प्रभात फेरी वृक्ष लागवड येणारा पावसाळ्यात विजांपासून बचाव आदी विषयांवर मार्गदर्शन केले . कार्यक्रमास सावखेडा केंद्राचे नवनियुक्त केन्द्रप्रमुख सुनिल चौधरी यांची विशेष उपस्थिती होती . कार्यक्रमा स विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते .*