नविन शैक्षणीक वर्ष 2025-26 चा सुंदर प्रवेशोत्सव: पुष्पगुच्छ वाटप, वृक्षारोपण आणि धमाल नृत्यांनी रंगला पहिला दिवस
अमळनेर प्रतिनिधी
आज दि. 16 जून 2025, सोमवार रोजी नविन शैक्षणीक वर्ष 2025-26 चा उत्साहवर्धक प्रवेशोत्सव मोठ्या आनंदाने साजरा करण्यात आला. या मंगलकार्यक्रमात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब डॉ. योगेश रघुनाथ महाजन सर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ, वही, पेन तसेच खाऊ वाटप करण्यात आले.
शाळेतील सर्व विद्यार्थी गुलाबांच्या सुगंधी पुष्पांनी आणि रंगीबेरंगी पुष्पवर्षावांनी परिपूर्ण स्वागताच्या गजरात स्वागत करण्यात आले. या स्वागतसोहळ्यात ढोल-ताश्यांच्या तालावर आनंदोत्सव सुरू होता. विद्यार्थ्यांना शालेय गणवेश व आवश्यक शैक्षणिक साहित्य हस्तगत करण्यात आले.
सर्व वर्ग शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे हाताचे ठसे घेऊन त्या छायाचित्रांसाठी फ्रेम तयार केली, जी नंतर आठवणींच्या रूपात संग्रही ठेवण्यात येणार आहे. याशिवाय, प्रत्येक विद्यार्थ्याच्या हाताने वृक्षारोपणाचा शुभप्रारंभ केला गेला, ज्यामुळे पर्यावरण संरक्षणाचा संदेशही देण्यात आला.
यानंतर विद्यार्थ्यांनी धमाल करत विविध गाण्यांवर नृत्य केले व खेळीमेळीच्या अद्भुत वातावरणात शाळेचा पहिला दिवस हर्षोल्हासाने साजरा झाला. या उत्सवामध्ये संपूर्ण शाळा कर्मचारी वर्गही उपस्थित होता, ज्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सक्रिय सहभाग घेतला.