
वर्णेश्वर महादेव मंदिरात एका अज्ञात इसमाला पोलिसांनी घेतले ताब्यात…
त्याच्या जवळील पोलिसांनी केला मुद्देमालसह जप्त
अमळनेर प्रतिनिधी
आज दिनांक २७/१२/२०२२ रोजी पो.नि. विजय शिंदे यानां पेट्रोलिंग दरम्यान मिळालेल्या गोपणीय बातमी नुसार १९/१० वाजता अमळनेर शहरात
पैलाड भागातील अमळनेर ते चोपडा रोड लगत असलेल्या वर्णेश्वर महादेव मंदिरमध्ये इसम नामे अविनाश बाळु शिरसाठ वय२६ रा. वाडी बु. ता. शिरपुर जिल्हा
धुळे हा विना परवाना एक गावठी बनावटीचे ६ बोर चे एक रिव्हालवर, चाकु,
फायटर, दोन मोबाईल हॅण्डसेट असा एकुण २७,८००/- कि. चा ऐवज कब्जात बाळगुन मिळुन आल्याने त्याचेवर विरुध्द पोना डॉ शरद तुकाराम पाटील यानीं फिर्याद दिले वरुन अमळनेर पोस्टे ला भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ सह
म.पो.का.क.१३५ अन्वये गुन्हा दाखल केला
असुन सदर गुन्हयाचा तपास पोहेकाँ/१०२ सुनिल पाटील हे करत आहेत.
सदरची कारवाई पोलीस निरीक्षक विजय शिंदे यानीं स्वता समक्ष त्याचे
पथकातील अमलदार पोहेका/ सुनिल हटकर, पोहेका/ किशोर पाटील, पोना/दिपक माळी, पोना/ रविंद्र पाटील, पोना/ सिध्दांत बलवंत सिसोदे पोना शरदपाटील यानीं केली आहे.