जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षकेतर कर्मचाऱी पतपेढी निवडणुकीत सहकार पॅनलचे निर्विवाद वर्चस्व…
अमळनेरमध्ये अपक्ष उमेदवार तुषार बोरसे विजयी


अमळनेर प्रतिनिधी- जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पतपेढीचा निवडणुकीची निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. त्यात जळगांव जिल्हा माध्यमिक पतपेढीत सहकार पॅनलचे निर्विवाद वर्चस्व सिद्ध झाले. सहकार पॅनल प्रमुख दादासाहेब एस.डी.भिरूड
यांच्या पॅनलच्या सर्वाधिक जागा निवडून आल्या. सहकार पॅनलच्या 5 जागा बिनविरोध झाल्या होत्या. निवडणुकीत सहकार पॅनलच्या 10 जागा निवडून आल्या म्हणजे सहकार पॅनलच्या 15 जागा निवडून आल्या.
तर अपक्षाच्या 6 जागा आल्या.
अमळनेरमध्ये सहकार पॅनलचे एम. ए पाटील व अपक्ष उमेदवार तुषार बोरसे यांच्यामध्ये लढत होती त्यात तुषार नारायण बोरसे यांना 529 मते मिळाली व ते विजयी झाले व त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार मधुकर आनंदा पाटील यांना 243 मते मिळाली.
अपक्ष विजयी उमेदवार तुषार बोरसे यांचा निवडणुकीत यश संपादन केल्याबद्दल विविध संघटनेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.