• Tue. Jun 17th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

मुंबई शिक्षण विभागात “झिरो पेंडेन्सी” सुरू करा

Feb 18, 2023

Loading

मुंबई शिक्षण विभागात “झिरो पेंडेन्सी” सुरू करा

अनिल बोरनारे यांची शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे मागणी

मुंबई,ठाणे (मनिलाल शिंपी) मुंबईतील शिक्षकांच्या कामांचा तातडीने निपटारा व्हावा यासाठी मुंबईतील शिक्षण अधिकारी कार्यालयात झिरो पेंडेन्सी प्रणाली सुरू करण्यात यावी अशी मागणी भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष व मुंबई मराठी अध्यापक संघाचे कार्यवाह अनिल बोरनारे यांनी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे मागणी केली आहे
याबाबत अनिल बोरनारे यांनी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे निवेदन देऊन ही मागणी केली आहे
शिक्षकांच्या विविध समस्यांच्या फाईली तातडीने निकाली काढण्याबाबत पुणे येथील शिक्षण विभागात पुणे पॅटर्न राबविण्यात येत आहे याची अमलबाजवणी मुंबई विभागात व्हावी यासाठी शिक्षण विभागाने प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे अनिल बोरनारे यांनी सांगितले
मुंबई विभागात तीन शैक्षणिक जिल्हे असून त्यात शिक्षण निरीक्षक बृहन्मुंबई उत्तर, पश्चिम व दक्षिण विभाग येतात तर मुंबई महानगरपालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांसाठी मुंबई महानगरपाकिकेचा स्वतंत्र विभाग आहे. शिक्षकांची विविध सेवाशर्तीचे प्रश्न या विभागाकडून सोडविले जातात तथापि यामध्ये अनेकदा दिरंगाई केली जात असल्याच्या तक्रारी येत असतात शिक्षकांचे सेवासातत्य, मेडिकल बिले, पीएफ वरील कर्ज, निवृत्ती वेतन, अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन, अनुकंपा मान्यता, बदली मान्यता यासह अनेक प्रश्न प्रलंबित असतात तर अनेकदा संबंधित विभागाकडून फाईली गहाळ झाल्याचे सांगितले जाते त्यात शिक्षकांना शिक्षण विभागात विनाकारण हेलपाटे मारून नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. शिक्षकांच्या सेवाशर्तीचा कोणताही प्रस्ताव शाळेने शिक्षण विभागाकडे सादर केल्यावर “ट्रॅकिंग सिस्टीम” सुरू करावी जेणेकरून फाईलची सद्यस्थिती कळेल यामुळे ही सिस्टीम लवकरात लवकर मुंबई विभागात सुरू करण्याची मागणी अनिल बोरनारे यांनी केली असल्याची माहिती भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य बी. पी. घेरडे, सुभाष अंभोरे. विजय धनावडे, दशरथ काशिद यांनी दिली.