• Wed. Jun 18th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

महाराष्ट्रातील तमाम शिवप्रेमींना शिवजयंती निमित्ताने मनःपूर्वक शुभेच्छा!

Feb 18, 2023

Loading

जाहिरात

छत्रपती शिवाजी महाराज म्हटल म्हणजे आठवतं रयतेवर स्वत: पेक्षा जास्त प्रेम करणारा राजा..शेतकऱ्यांचा हितदक्ष राजा..स्री ला समानतेने वागविणारा रक्षणकर्ता.
दीन दुबळ्याचा कैवारी..युद्धात युक्तीने जिंकणारा धुरंधर राजा..नीतीने जगुन आदर्श ठेवणारा जाणता राजा..मातृभक्त, शिस्तप्रिय, परोपकारी राजा..विनयशील, शत्रूला दरारा निर्माण करणारा शूर राजा..महाराष्ट्राची शान, कर्तृत्वाची जाण, समतेचे भान ठेवणारा राजा…
तमाम शिवप्रेमी बांधव भगिनींना शिवजयंती निमित्ताने शुभेच्छा!
शुभेच्छुक
श्री किशोर विश्वनाथ अढळकर*
इलेक्ट्रिकल इंजिनिअर, बिझनेस इंटरप्रेनियर (व्यावसायिक),
मोटिवेशनल स्पीकर, बिझनेस कोच,
ट्रेकर, सोशल वर्कर,आपत कालीन व्यवस्थापन सदस्य,
सिव्हिल डिफेन्स मेंबर,
रोटरी क्लब मेंबर – सचिव २०२२-२३
कामाचा अनुभव:
शिक्षण संपल्या नंतर १.हिंदुस्तान लिव्हर शिवडी मुंबई येथे मेंटेनन्स इंजिनिअर म्हणून काम केले.
२. J P Morgan अंधेरी मुंबई येथे इंजिनिअरिंग इन्चार्ज म्हणून काम पाहिले.

सन २००४-२००५ ला “विश्वा इंजिनिअरिंग सर्व्हिसेस” ही स्वतःची कंपनी स्थापन केली. व कन्सल्टंट इलेक्ट्रिकल म्हणून कार्यरत आहे, यात विविध वास्तू, इमारती, स्कूल, कॉलेज, हॉटेल तसेच इंडस्ट्रीज चे विविध प्रोजेक्ट यशस्वी रित्या पार केले.

नित्याने वर्षभर विविध दुर्ग भ्रमंती (ट्रेकिंग) चे आयोजन करून स्वतः आनंद घेत इतरांना ही प्रेरणा देतात.

सामाजिक उपक्रम:

आजवर समाजाने बरच काही दिलं आहे, आता मला समजला काहीतरी दिलं पाहिजे या तत्त्वावर समाज उपयोगी उपक्रम राबविण्यात येतात.
१. ग्रामीण भागात मेडिकल कँप.
२. प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी मोफत नेत्र चिकित्सा, तपासणी शिबिर व मोतीबिंदू शस्त्रक्रिया
३. प्रतिवर्षी जून जुलै महिन्यात वृक्ष लागवड आणि त्याचे संगोपन.
४. शाळेतील मुलांसाठी विविध कला आणि क्रीडा स्पर्धा आयोजित करणे व बक्षिसे देऊन त्यांना प्रेरणा करणे.
५.व्हाय टू स्टडी अंड हाऊ टू स्टडी– अभ्यासात मागे पडलेल्या मुलांसाठी विशेष व्याख्यानमाला.
६. आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या समाजाबरोबर सण साजरे करणे व त्यांचा आनंद द्विगुणित करणे.एक आदर्श व्यक्तिमत्व

You missed