१० जुन वाढदिवस यशोगाथा..
संघर्षातून सन्मानाकडे – सुरेश चव्हाण आण्णासाहेबांचा प्रेरणादायी प्रवास…
घरात अठराविश्व दारिद्र्य…
आईवडील अशिक्षित, मोलमजुरीवर घराचं रहाटगाडगे चाललेलं…घरात दोन भाऊ, एक बहीण असा परीवार…
शाळेची वहीसुद्धा वेळेवर मिळेल की नाही, ही शंका असणाऱ्या परिस्थितीत शिकण्याची तीव्र इच्छा, अपार मेहनत आणि जिद्द यांच्या जोरावर सुरेश जगन्नाथ चव्हाण, आजचे आपले अण्णासाहेब,पोलीस खात्यात दाखल झाले. हा प्रवास सोपा नव्हता…पण त्यांच्या डोळ्यांत होतं स्वप्न – “आपल्या घरासाठी, समाजासाठी काहीतरी करायचं!”
SRP गट ८ मध्ये १९९३ साली भरती होऊन गडचिरोलीच्या जंगलांपासून ते मुंबईच्या गर्दीत,नाशिकच्या चौकात, गुजरातच्या निवडणूक बंदोबस्तात
त्यांनी सतत कर्तव्य, शिस्त आणि निष्ठा यांचे दर्शन घडवले.
आईबाबांचे हात कामाने थकले…
पण मुलाने यशाचे कमावलेले सन्मान त्यांच्या डोळ्यांत पाणी आणणारे ठरले.
आज आईवडील मिळवलेले यश पाहण्यासाठी नाहीत,पण त्यांचा आशीर्वाद पाठीशी आहे…
या यशामागे पत्नी सौ. निर्मला सुरेश चव्हाण यांचे मोलाचे योगदान आहे.
घर सांभाळताना त्यांनी मुलांच्या शिक्षणात, संस्कारात कुठलीही कमी होऊ दिली नाही.
आज अण्णासाहेबांचा गोतावळा मोठा आहे –एक मुलगा आणि चार मुली – सर्वजण उच्चशिक्षित, सुसंस्कारित आणि यशस्वी!
प्रज्वल सुरेश चव्हाण – Chennai येथे CGI Executive Officer पदावर कार्यरत.
भाग्यश्री सुरेश चव्हाण – B.Com पदवीधर, एक कुशल Fashion Designer
पद्मश्री सुरेश चव्हाण – B.Com, आणि कल्पक Graphic Designer
अश्विनी सुरेश चव्हाण – M.A. (Political Science)
पूजा सुरेश चव्हाण – M.Sc (Environmental Science), सध्या Lecturer म्हणून कार्यरत
अण्णासाहेबांनी फक्त पोलीस खात्यातच नव्हे, तर स्वतःच्या घरातही एक सुंदर, सशक्त, आणि सुशिक्षित कुटुंब घडवले आहे.ते कर्तव्यनिष्ठ अधिकारी जितके होते, तितकेच ते आदर्श पती आणि जबाबदार वडील देखील आहेत.
३० जून २०२३ रोजी राखीव पोलीस निरीक्षक पदावरून सेवानिवृत्त होतांना,
तेवढेच शांत, नम्र आणि मनाने मोठे दिसले,जसे ते सुरुवातीपासून होते…
10 जून, स्थळ – कळमसरे, तालुका अमळनेर, जिल्हा जळगाव,
या भूमीत जन्मलेले, आणि “अण्णासाहेब” या टोपणनावाने सर्वांच्या हृदयात स्थान मिळवणारे
श्री. सुरेश जगन्नाथ चव्हाण यांचा आज वाढदिवस!
एक सामान्य कुटुंबातून आलेले, पण असामान्य कर्तृत्व गाठणारे अण्णासाहेब
हे एक आदर्श सेवक, जबाबदार अधिकारी आणि अत्यंत संवेदनशील माणूस म्हणून
आजही सर्वांच्या स्मरणात आहेत.
त्यांच्या सेवेचा व्याप केवळ ग्रामीण मर्यादित नव्हता,तर बृहन्मुंबईमध्येही त्यांनी वरळी, ताडदेव, नायगाव, मरोळ याठिकाणी जबाबदारीने काम केले.
PTS धुळे, नाशिक शहर, आणि नाशिक ग्रामीण येथेही त्यांनी आपल्या अनुभवाचा अमूल्य ठेवा सेवा रूपात दिला.
ते आजही त्यांच्या शिस्त, निष्ठा आणि सामाजिक जाणिवांमुळे
सर्वांच्या मनात आदराने विराजमान आहेत.
**शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करीत रहावी…..
कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी!
तुमच्या इच्छा-आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे!
तुमच्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे!
…तुम्हाला दीर्घायुष्य लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!**
—
🌟 60 व्या वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा अण्णासाहेब! 🌟
शुभेच्छुक :
ईश्वर आर. महाजन, पत्रकार अमळनेर
📞 9860352960