• Mon. Jun 16th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

विवाह सोहळा व कौटुंबिक अनुचित प्रकाराविरोधात भाविकांनी घेतली शपथ मंगळग्रह सेवा संस्थेचा स्तुत्य उपक्रम

Jun 10, 2025

Loading

विवाह सोहळा व कौटुंबिक अनुचित प्रकाराविरोधात भाविकांनी घेतली शपथ

मंगळग्रह सेवा संस्थेचा स्तुत्य उपक्रम

अमळनेर प्रतिनिधी :

विवाह सोहळा व कौटुंबिक जीवनातील अनुचित प्रकारा विरोधात मंगळवार व वट सावित्री पौर्णिमेचे औचित्य साधून १० रोजी मान्यवरांच्या समक्ष मंगळग्रह मंदिरात आलेल्या हजारो भाविकांनी शपथ घेतली.
केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभरामध्ये कौटुंबिक हिंसाचार आणि पारंपारिक भारतीय तथा हिंदू विवाह संस्कृतीला आड फाटा देऊन पाश्चिमात्य संस्कृतीचे अंधानूकरण करणारे, अत्यंत विभत्स व अनुचित गैरप्रकार सर्वत्र सुरू झाले आहेत. हे कुठेतरी थांबले पाहिजे. या हेतूने मंगळ ग्रह सेवा संस्थेच्या माध्यमातून १० रोजी सकाळी ११ वाजता श्री मंगळ ग्रह मंदिर येथे उपस्थित हजारो भाविकांना माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील, माजी नगराध्यक्षा जयश्री पाटील,उपविभागीय अधिकारी नितीनकुमार मुंडावरे, उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते यांनी शपथ दिली. यावेळी व्यासपीठावर मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले, निवृत्त तहसीलदार आर. जी. चव्हाण, मुख्याधिकारी तुषार नेरकर, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे जिल्हा अध्यक्ष करणसिंग राजपूत उपस्थित होते. अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव संदीप घोरपडे, अर्बन बँकेच्या संचालिका वसुंधरा लांडगे, ॲड. भैय्यासाहेब मगर आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
समाजातील अनुचित गैरप्रकार थांबवण्यासाठी ही सामूहिक शपथ दिली गेली आहे . आता मंदिरात अभिषेकासाठी येणाऱ्या सर्वच भाविकांना कायमस्वरूपी ही शपथ दिली जाणार आहे. अशा प्रकारचे पुरोगामी तथा क्रांतिकारी पाऊल उचलणारे श्री मंगळ ग्रह मंदिर हे देशातील पहिलेच मंदिर ठरणार आहे. यापूर्वीही वस्त्र संहितेचा एल्गार याच श्री मंगळ ग्रह मंदिराने सर्वप्रथम पुकारला होता हे विशेष…!
याप्रसंगी अमळनेर नगर परिषद, मंगळ ग्रह सेवा संस्था व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर ‘प्लास्टिक प्रदूषणाचा अंत करणे’ निमित्त प्लास्टिक निर्मुलन मोहिम अंतर्गत पथनाट्ये देखील सादर करण्यात आले. प्रदूषण रोखण्यासाठी वसुंधरेचे रक्षण व संवर्धन करण्यासाठी आणि प्लास्टिक विरोधातही सामूहिक शपथ घेण्यात आली.
उपक्रम यशस्वीतेसाठी संस्थेचे उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सहसचिव दिलीप बहिरम, विश्वस्त अनिल अहिरराव, जयश्री साबे, जनसंपर्क अधिकारी रवींद्र मोरे, मंगल सेवेकरी प्रकाश मेखा, उज्वला शाह, विलास कुलकर्णी, पुषंद ढाके, बाळा पवार, ऋत्विक भामरे आदींनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed