• Sun. Jun 15th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

साळव्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद* *प्रत्येक नागरिक, गरजू लाभार्थ्यांना थेट घरपोच लाभ देणारं अभियान* :- मा. ना. गुलाबरावजी पाटील ▪️ एका शिबीरात एवढा विक्रमी लाभ देणारे जिल्ह्यातील पहिले महाराजस्व शिबीर

Jun 15, 2025

Loading

* *साळव्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद*

*प्रत्येक नागरिक, गरजू लाभार्थ्यांना थेट घरपोच लाभ देणारं अभियान*
:- मा. ना. गुलाबरावजी पाटील

▪️ एका शिबीरात एवढा विक्रमी लाभ देणारे जिल्ह्यातील पहिले महाराजस्व शिबीर

 

(पी.डी.पाटील)

*धरणगाव प्रतिनीधी, दि. १४ जून – जिल्हा प्रशासनाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर २०२५ अंतर्गत साळवे तालुका धरणगाव येथील विठ्ठल मंदिराच्या प्रांगणात आयोजित भव्य शिबिरास पंचकोशीतील ग्रामस्थ व लाभार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरात विविध विभागातील सर्वाधिक म्हणजे ३२५१ लाभार्थ्यांना विविध शासकीय सेवा व योजनांचा थेट लाभ प्रदान करण्यात आला.*

सकाळपासूनच लाभार्थ्यांची गर्दी शिबिरस्थळी उसळली होती. एकाच छताखाली विविध सेवा मिळणार असल्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण होते. महसूल, कृषी, आरोग्य, समाजकल्याण, महिला व बालकल्याण, महावितरण, तहसील, दुय्यम निबंधक, पुरवठा, शिक्षण विभाग आदी २५ विभागांचे २५ स्टॉल्स शिबिरात उभारण्यात आले होते. सातबारा उतारे, जातीचे दाखले, उत्पन्न दाखले, अधिवास प्रमाणपत्र, नॉन क्रीमीलेयर प्रमाणपत्र, DBT प्रकरणे, संजय गांधी व इंदिरा गांधी योजना प्रकरणे, राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना, आधार लिंकिंग, E केवायसी करणे, रेशन कार्ड सुधारणा, प्रधानमंत्री आवास योजनेतील तयार घरांच्या चाब्या देणे व नवीन नोंदणी करणे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुलांना गणवेश व बूट वाटप करणे, महिला व बालकल्याण विभागामार्फत बेबी केअर केकचे वाटप करणे अशा अनेक सेवा या ठिकाणी तत्काळ उपलब्ध करून देण्यात आल्या.

शिबिराचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री मा ना श्री गुलाबरावजी पाटील (जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री) यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी श्री चंद्रशेखर अत्तरदे भाजपाचे ज्येष्ठ नेते, शिवसेनेचे नेते श्री मोतीआप्पा पाटील, स्वीय सहाय्यक अभिजीत पाटील, साळव्याच्या सरपंच सौ आशा कोल्हे, उपसरपंच बयमा बी पटेल, नांदेडचे सरपंच राजेंद्र अत्तरदे, तहसीलदार श्री महेंद्र सूर्यवंशी, नायब तहसीलदार लक्ष्मण सातपुते, सहाय्यक तहसीलदार संदीप मोरे, ग्रामपंचायत विस्तार अधिकारी योगेश अहिरे, आरोग्य केंद्राचे मेडिकल ऑफिसर कुणाल चिंचोरे, मंडळ अधिकारी, तलाठी, तसेच अनेक मान्यवर अधिकारी उपस्थित होते. उद्घाटनानंतर महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाला सुरुवात झाली.

उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन करताना मा ना गुलाबराव जी पाटील म्हणाले की,

> “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर म्हणजे जनतेच्या चेहऱ्यावर समाधान फुलवणारा उपक्रम. साळव्यामध्ये जिल्ह्यातील सर्वात मोठ समाधान शिबिर झाल असून, हजारो लोकांना थेट लाभ देण्यात आला. प्रशासन जनतेच्या कल्याणकारी सेवा, सुविधा घरपोच करण्यासाठी तयार आहे तुम्ही सहकार्य करा. हीच शासनाची ताकदच जनतेच्या जीवनातील समाधानाचा महामार्ग होईल.” असे सांगितले.
यावेळी त्यांनी परिसरात मंजूर साळवा ते पष्टाने रस्त्याचे काम उद्या सुरू होणार असल्याचे सांगितले.

*महिला बचत गटांना दिला मोठा आर्थिक हातभार.*
या शिबिरात नव मतदारांना मतदान ओळखपत्र, गटविकास अधिकाऱ्यांकडून जॉब कार्ड व आरोग्य अधिकाऱ्यांकडून गोल्डन कार्ड वाटप करणे व नवीन काढणे आणि आरोग्य तपासणी करण्यात आली व इतर आवश्यक साहित्य लाभार्थ्यांच्या हस्ते सुपूर्त करण्यात आले.

प्रास्ताविक करताना तहसीलदार श्री महेंद्र सूर्यवंशी यांनी समाधान शिबीराचे महत्व सांगून साळवा महसूल मंडळातील, साळवे, निशाने रोडवर, नांदेड, खर्दे, भांबर्डी, कामतवाडी, उखळवाडी पंचक्रोशीतील नागरिकांना शिबीराचे वैशिष्ट्य सांगतांना ते म्हणाले,

> “समाधान शिबिर ही पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांच्या दूरदृष्टीची संकल्पना असून, त्यांच्यामुळेच प्रशासन गावागावात जाऊन लोकांना थेट सेवा देत आहे. जनतेच्या दारात सेवा पोहोचवण्याचे कार्य यामधून घडत आहे.” आणि दर तीन महिन्यांनी हे शिबिर पंचक्रोशीत भरवले जाणार आहे.

यावेळी विशेष आरोग्य तपासणीचे आयोजन करण्यात आले होते. त्याला लोकांनी उत्तम प्रतिसाद दिला.
या कार्यक्रमाला मंडळ अधिकारी सुनील पानपाटील, पुरवठा निरीक्षण अधिकारी रेवणा कांबळे, निरीक्षक किशोर मोरे, रोटवदचे तलाठी गौरव बाविस्कर, महसूल सहाय्यक गणेश पवार, पोलीस पाटील निसार पटेल व नरेंद्र शिंदे, एकलव्य सेनेचे जिल्हाध्यक्ष बापू मोरे, रेशन दुकानदार संघटनेचे अध्यक्ष अरविंद ओस्तवाल, विनोद गुप्ता, सुधाकर पाटील, खरद्याचे पोलीस पाटील राजेंद्र केंदळे, साळव्याचे तलाठी रोशन ठाकरे, ग्राम विस्तार अधिकारी रमेशजी देवरे, संजयभाऊ कोल्हे, निवडणूक शाखेचे पिंटू भाऊ पवार, अंगणवाडी सेविका व आशाताई, जि प शाळेचे मुख्याध्यापक विलास चव्हाण, सुरेंद्र सोनवणे व साळवे इंग्रजी विद्यालयाचे मुख्याध्यापक सुधाकर मोरे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच हजारोंच्या संख्येने नागरिक व महिला बचत गटाच्या सदस्य आणि लाभार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस डी मोरे सर यांनी केले, तर आभारप्रदर्शन नायब तहसीलदार लक्ष्मण सातपुते यांनी केले.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed