• Sun. Jun 15th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

वारकरी भक्ती आणि योग यांचा संगम असलेला हा उपक्रम पुणे शहराच्या इतिहासात एक आगळावेगळा उपक्रम ठरेल, असा विश्वास – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील*

Jun 15, 2025

Loading

*वारकरी भक्ती आणि योग यांचा संगम असलेला हा उपक्रम पुणे शहराच्या इतिहासात एक आगळावेगळा उपक्रम ठरेल, असा विश्वास – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील*

पुणे : श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या २१ जून रोजी पुणे शहरात मुक्काम करणार असून, योग दिनाचे औचित्य साधून राज्य शासनाच्या पुढाकाराने एक भव्य ‘वारकरी भक्तीयोग उपक्रम’ आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमात पाच लाखांहून अधिक वारकरी सहभागी होण्याची अपेक्षा असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली . या पार्श्वभूमीवर शनिवारी विद्यापीठात या उपक्रमाच्या संदर्भात पूर्वतयारी बैठक पार पडली. या बैठकीला पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यामध्ये ६०० हून अधिक स्वयंसेवक आणि कार्यक्रम अधिकारी सहभागी झाले होते. वारकरी भक्ती आणि योग यांचा संगम असलेला हा उपक्रम पुणे शहराच्या इतिहासात एक आगळावेगळा उपक्रम ठरेल, असा विश्वास पाटील यांनी या बैठकीत व्यक्त केला.

महाराष्ट्र सरकार, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे महानगरपालिका, राष्ट्रीय सेवा योजना, श्रीक्षेत्र आळंदी, श्रीक्षेत्र देहू, विद्यार्थी विकास मंच यांच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शहरात सुमारे पाच लाख वारकरी आणि तितकेच पुणेकर भजन, कीर्तन, प्रवचन, योगसाधना अशा विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत.

आजपर्यंत १६७ महाविद्यालयांतील ५,००० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला असून उपक्रमाचे सूक्ष्म नियोजन सुरू आहे. या उपक्रमात शहरातील २०० हून अधिक महाविद्यालये, १८ स्वायत्त विद्यापीठे, विविध सामाजिक संस्था, राजकीय पक्ष, आणि गणेश मंडळांचे कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.

उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे राज्याचे संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, उपक्रमाचे संयोजक आणि राष्ट्रीय सेवा योजना राज्य सल्लागार समितीचे सदस्य राजेश पांडे, कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, कुलसचिव डॉ. चारुशीला गायके, तसेच विद्यापीठ व्यवस्थापन समितीचे सदस्य रवींद्र शिंगणापूरकर, भाग्यश्री मंठाळकर, सागर वैद्य, डॉ. नितीन घोरपडे, संगीता जगताप आणि एनएसएसचे संचालक डॉ. सदानंद भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती.

विद्यार्थ्यांचे परदेशी शिक्षणाचे स्वप्न आता भारतातच पूर्ण होणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठांना आशयपत्र प्रदान कार्यक्रम संपन्न
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक प्रयोगशाळा कर्मचारी महासंघ राज्यस्तरीय चर्चासत्र संपन्न.* *प्रयोगशाळा कर्मचाऱ्यांचे प्रश्न शासन दरबारी मांडून आपल्याला न्याय देण्यासाठी हा आमदार आपल्या पाठीशी सदैव असेल याची आपण काळजी आणि चिंता करू नका:शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे*
महाराष्ट्र माळी समाज महासंघाची 2025-2026 साठी नवीन कार्यकारणी लवकरच जाहीर**

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed