अमळनेरात युवा परीट धोबी मंडळ व परदेशी धोबी समाज यांच्या संयुक्तविद्यमाने संत गाडगेबाबा जयंती उत्सवात संपन्न
अमळनेर-निष्काम कर्मयोगी, मानवतेचे पुजारी संत गाडगेबाबायांची 147 वी जयंती उत्सव दि २३ फेब्रुवारी रोजी सकाळी ह.भ.प.प.पू.प्रसाद महाराज यांच्याहस्ते गाडगे बाबाच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले. याप्रसंगी युवा परीट मंडळ व परदेशी धोबी समाज कार्यकारिणी,सल्लागार व समाज बांधव उपस्थित होते..
तसेच दुपारी मिरवणुकीच्या मार्गावर सुशोभित वेगवेगळ्या प्रकारच्या रांगोळ्या काढण्यात आल्या .
“गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला” चा जयघोष व पारंपारिक वाद्यचा तालावर मिरवणूक वाडीचौक- पानखिडकी- सराफ बाजार -दगडी दरवाजा- गाडगेबाबा चौक मार्गे मिरवणूक गाडगेबाबा उद्यानात समारोप करण्यात आला
गाडगेबाबा चौकात राकेश भाऊ परदेशी व युवा परीटधोबी मंडळ व परदेशी धोबी समाजाच्या वतीने शरबत वाटप कार्यक्रम करण्यात आला. सदरजयंती व मिरवणुक कार्यक्रमास “युवा परीट मंडळ” व “परदेशी धोबी समाज” बंधु व भगिनी मोठ्या व विक्रमी संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दोघे कार्यकारिणीतील सदस्य व सल्लागार व समाज बांधवांनी प्रयत्न केले.
