• Tue. Jun 17th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

वसुंधरा लांडगे यांना माँ जिजाऊ शिक्षिका रत्न पुरस्काराने सन्मानित..

Feb 27, 2023

Loading

वसुंधरा लांडगे यांना मां जिजाऊ शिक्षिका रत्न पुरस्कार प्रदान

अमळनेर–कला व क्रीडा शिक्षक समन्वय समिती धुळे जिल्हा आणि अमळनेर तालुका क्रीडा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजन्मोत्सव निमित्ताने “साने गुरुजी विद्यामंदिरातील शिक्षिका सौ.वसुंधरा दशरथ लांडगे यांना”राज्यस्तरीय मां जिजाऊ शिक्षिका रत्न पुरस्कार २०२३ देऊन गौरविण्यात आले.त्यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्यातील योगदानाबद्दल गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खा.शि.मंडळाचे कार्योपाध्यक्ष योगेश मुंदडे होते.उद्घाटक कार्याध्यक्ष हरी भिका वाणी होते.पुरस्कारांचे वितरण जि.प.सदस्या जयश्री ताई पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी खा.शि.मंडळाचे संचालक प्रदीप अग्रवाल,नीरज अग्रवाल, अमळनेर प.स.सभापती शाम अहिरे, अमळनेर न.प.उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड व क्रीडा समिती चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.‍ कार्यक्रम यशस्वीतेसाठी हेमंत भदाणे, सुनील वाघ, योगेश वाघ, राहुल पाटील,संजय पाटील यांनी परिश्रम घेतले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वसुंधरा लांडगे यांनी केले.आभार वाघ सरांनी मानले.कार्यक्रमास मोठ्या संख्येने शिक्षक बंधु भगिनी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *