• Tue. Jun 17th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

पी आर हायस्कूल मध्ये मराठी राजभाषा दिवस साजरा

Feb 27, 2023

Loading

पी आर हायस्कूल मध्ये मराठी राजभाषा दिवस साजरा
धरणगाव-येथील शतकोत्तरी शिक्षण गंगा पी आर हायस्कूल मध्ये कविश्रेष्ठ वि. वा.शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवस निमित्ताने शाळेत मराठी राजभाषा दिवस साजरा करण्यात आला . मराठी राज गीतांनी कार्यक्रमाची सुरुवात झाली धरणगाव तालुक्याचे पोलीस निरीक्षक मा उद्धव डमाळे पर्यवेक्षक मा के आर वाघ सर डॉ सौ वैशाली गालापुरे सौ एस पी तावडे यांचें शुभहस्ते कुसुमाग्रज यांच्या प्रतिमांचे पूजन केले व माल्यार्पण केले. याप्रसंगी मराठी राजभाषा व वि. वा. शिरवाडकर यांच्या बद्दलची माहिती शाळेतील ज्येष्ठ शिक्षक एस पी तावडे यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.डॉ गालापुरे यांनी मराठी भाषेचा समृद्ध इतिहास सांगितला मराठीतील बारकावे सांगितलं कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश सिंह सूर्यवंशी मेजर डी एस पाटील सर यांनी केले.आभार प्रदर्शन के आर वाघ सरांनी केले कार्यक्रमाप्रसंगी शाळेतील एस पी सोनार व्हि एच चौधरी डी एच कोळी एम व्हि पाठक पी जी पाटील यांनी अनमोल सहकार्य केले सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *