• Tue. Jun 17th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

इन व्हॅलिड आधार कार्ड दोन दिवसात व्हॅलिड होणार शिक्षक आमदार डॉ.ज्ञानेश्वर म्हात्रे यांची यश घोडदौड.

Mar 1, 2023

Loading

,

इन व्हॅलिड आधार कार्ड दोन दिवसात व्हॅलिड होणार शिक्षक आमदार डॉ.ज्ञानेश्वर म्हात्रे यांची यश घोडदौड. मुंबई ठाणे( मनिलाल शिंपी ): महाराष्ट्र राज्यातील विनाअनुदानित, त्रुटी पूर्तता, अंशतः अनुदानित शाळांना अनुदान संदर्भात 6 फेब्रुवारी 2023 चा शासन निर्णय जाहीर केला होता त्या जीआरच्या अटी प्रमाणे पडताळणी सुरू होणार आहे, आधार कार्ड वर आधारित संच मान्यता होईल व त्यानुसार शिक्षकांना अनुदान दिले जाईल असा नियम असल्याने राज्यातील अनेक शाळांमध्ये अटीप्रमाणे विद्यार्थी संख्या आहे सर्व विद्यार्थ्यांचे आधार कार्ड 100 % सुद्धा आहेत, मात्र अनेक विद्यार्थ्यांचे आधार कार्ड इन वॅलिड दाखवतत असल्याने शिक्षकांच्या -शाळांच्या मनामध्ये इनव्हॅलिड आधार कार्ड मुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले. आधार कार्ड 100% असूनही कोणावरी अन्याय होऊ नये म्हणून शिक्षक आमदार माननीय श्री ज्ञानेश्वर म्हात्रे व शिक्षक आमदार माननीय श्री जयंत तासगावकर सर यांनी अव्वर सचिव. श्री काजी साहेब यांची भेट घेतली तसेच शिक्षण आयुक्त कार्यालयातील राजेश शिंदे ही त्या ठिकाणी उपस्थित होते. *ज्या शाळांचे आधार कार्ड इन्व्हॅलिड दिसतात ते त्या शाळांना त्यांच्या लॉगिन मध्ये इन्व्हॉलीड दिसत असले तरी शासनाच्या लॉगिनला त्याचे व्हॅलिड करण्याची प्रोसेस सुरू आहे ,दोन दिवसात सर्व आधार कार्ड व्हॅलिड होतील* संच मान्यता सुद्धा तयार आहेत , एक आठवड्याच्या आत आधार कार्ड व संच मान्यता पूर्ण करून शाळांना दिल्या जातील, मंत्रालय स्तरावरून विनाअनुदानित आणि त्रुटी पूर्तता, अंशतः अनुदानित शाळांच्या याद्या उपसंचालकांकडे पाठवण्यात आलेले आहेत, त्यामुळे राज्यातील कोणत्याही शिक्षक शिक्षकेतर बंधू-भगिनींनी काळजी करू नये.अशी माहिती संपर्कप्रमुख विष्णू विशे यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *