• Tue. Jun 17th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

सामुदायिक विवाहसोहळ्यात विवाहबद्ध झालेले पुरोगामी विचारांचं उगवते युवा नेतृत्व सत्यजित तांबे

Mar 1, 2023

Loading

सामुदायिक विवाहसोहळ्यात विवाहबद्ध झालेले पुरोगामी विचारांचं उगवते युवा नेतृत्व सत्यजित तांबे –

कुठलीही गोष्ट, विचारधारा एखाद्या नेतृत्वाने फक्त भाषणांत बोलून समाज परिवर्तन होत नसते तर त्याची सुरूवात स्वआचरणातून दाखवावी लागते ‘तर आणी तरच’
समाज अशा नेतृत्वाच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहत असतो.

असंच युवा नेतृत्व म्हणजे नाशिक पदवीधर मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार सत्यजित तांबे यांच्या बाबतीत म्हणावे लागेल.
सध्या सत्यजित यांना सर्व पक्षातील नेते ,कार्यकर्ते, पदवीधर मोठ्या प्रमाणावर पाठींबा देत आहेत याचं कारण तांबे कुटुंबियांचा समाजसेवेचा वारसा.

वेळोवेळी सोशल मिडीयाच्या माध्यमातून विकासात्मक बाबींवर लक्ष वेधून घेणारे सत्यजित यांचे युट्यूब, फेसबुक, इन्स्टाग्रामवर लाखो फॉलोअर्स आहेत.

सत्यजित तांबे यांचा विवाह मोठ्या थाटामाटात, झगमगाटात झालेला असेल असा बर्याच जणांचा समज आहे पण वास्तव मात्र विचार करायला लावणारे आहे.

६ मे २०१२ रोजी सत्यजित तांबे हे १२१ जोडप्यांच्या सामुदायिक विवाह सोहळ्यात विवाहबद्ध झालेले आहेत.
अर्थात हा निर्णय जाणीवपूर्वक तांबे परीवाराचा होता.

त्याचप्रमाणे डॉ हर्षल तांबे यांचा विवाह देखील अवघ्या १०० माणसांच्या उपस्थितीत साध्या पद्धतीने साजरा झाला होता.

मुळातच या कुटूंबाला झगमगाट, अनावश्यक खर्चाचा भाग बनून समाजात वावरायचा मोहच नाही.
कुठलंही नेतृत्व दैनंदिन जीवनात कसे आचरण ठेवते याचं अनुकरण बहुतांश समाज करत असतो.समाजाला दिशा देण्याचं अथवा भरकटविण्याचं काम नेतृत्व करत असते असं म्हटलं तर वावगं ठरत नाही. याचा सकारात्मक विचार अनेक ठिकाणी सुरू झालेला असून तो सर्वव्यापी व्हायला हवा.

अनाठायी खर्चाला फाटा देत स्वतःच्या विवाहदिनी समाजातील विविध जातीधर्माच्या १२१ नवदाम्पत्यासोबत विवाहबद्ध होतांना सर्व खर्चाची, नियोजनाची जबाबदारी तांबे कुटुंबियांनी पार पाडली होतीहोती अशी माहिती जाणकारांकडून समजते.

अमृतवाहीनी इंजिनिअरींग कॉलेजच्या पटांगणात हा विवाहसोहळा प्रचंड जनसमुदायाच्या उपस्थितीत पार पडला होता.

आजोबा थोर स्वातंत्र्य सेनानी सहकारमहर्षी स्व. भाऊसाहेबजी थोरात यांच्या कडवट शिस्तीत थोरात ,तांबे कुटूंब त्यांचा वैचारिक वारसा वृद्धिंगत करत आहेत.

मामा राज्याचे काँग्रेस पक्षाचे विधीमंडळ गटनेते, माजी महसूलमंत्री पदासह विविध पदे भूषविणारे सलग ८ पंचवार्षिक मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करताना विधिमंडळातील सर्वात ज्येष्ठ नेते बाळासाबजी थोरात, वडील डॉ .सुधीर तांबे प्रख्यात संवेदनशील सर्जन ते सलग १३ वर्षे आमदार, आई मा. सौ दुर्गाताई तीसर्यांदा लोकनियुक्त नगराध्यक्षा असा हा समृद्ध वारसा असताना यांच्या कार्याच्या प्रभावाने स्वतः उच्चशिक्षित होऊन स्वतः ची विकासात्मक विचारधारा अंगीकारणारा युवा आमदार म्हणून सत्यजित यांची एन्ट्री झाली आहे.
नक्कीच दिशादर्शक वाटचाल हे नेतृत्व करेन यासाठी सदिच्छा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *