• Tue. Jun 17th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

पालघर पोलीस अधीक्षक यांची दमदार कामगिरी…
वेब मिडियाअसोसिएशनचे अध्यक्ष अनिल महाजन यांनी केला सत्कार

Mar 2, 2023

Loading

पालघर पोलीस अधीक्षक यांची दमदार कामगिरी…

वेब मिडियाअसोसिएशनचे अध्यक्ष अनिल महाजन यांनी केला सत्कार

मुंबई प्रतिनिधी-
पालघर पोलीस अधीक्षक श्री.बाळासाहेब पाटील यांनी यांच्या कामाची चुणूक दाखवत आपल्या गुन्हे शाखेच्या टीमला सोबत घेऊन उत्कृष्ट कामगिरी करून दाखवली. तब्बल ३८ मोटरसायकल चोरणाऱ्या ०३ आरोपींना अटक करून अनेक मोटरसायकल चोरीचे गुन्हे वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला उघडकीस आले. अशी चांगली कामगिरी करणाऱ्या पोलिसांच्या पाठीशी नेहमी लोकशाहीचा चौथा स्तंभ (मीडिया) उभा असला पाहिजे. यासाठी वरिष्ठ पातळीवर पोलीस महासंचालक कार्यालय, मंत्रालय, विधिमंडळ, सचिवालय, गृहमंत्रालय या ठिकाणी अशा पोलिसांच्या कार्याची दखल घेतली जावी म्हणून गर्जा महाराष्ट्र न्यूजचे मुख्य संपादक , वेब मीडिया असोसिएशनचे अध्यक्ष अनिल महाजन यांनी आपल्या उच्चस्तरीय पत्रकारितेच्या माध्यमातून वरिष्ठ पातळीवर बातमी पोचविण्याचे काम केले तसेच राज्यात चांगली कामगिरी करणाऱ्या पोलीस बांधवांच्या पाठीशी नेहमी उभे राहू असे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *