• Tue. Jun 17th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

साने गुरुजी कन्या हायस्कूल मध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा

Mar 2, 2023

Loading

साने गुरुजी कन्या हायस्कूल मध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा अमळनेर प्रतिनिधी
28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती अनिता बोरसे यांनी भूषविले. मा. अध्यक्षांच्या हस्ते सर सी व्ही रमण यांच्या प्रतिमेचे करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात “डोळे उघडून बघा गड्यांनो झापड लावू नका” या विज्ञान गीताने करण्यात आली.
सदर कार्यक्रमात समृद्धी अविनाश पाटील, वैष्णवी दिपक पाटील अक्षता शालिग्राम कोळी, पूर्वा निकेश देशमुख, गीता गोरखनाथ पवार या विद्यार्थिनींनी सर रोनाल्ड रॉस,व्यंकटरामन रामकृष्णन, सुब्रमण्यम चंद्रशेखर, सर सी व्ही रमण या थोर शास्त्रज्ञांची माहिती दिली.
विज्ञान शिक्षक श्री.दिपक रामभाऊ महाजन यांनी मार्गदर्शन केले. आपल्या भाषणात त्यांनी राष्ट्रीय विज्ञान दिन का साजरा करतात त्यामागील संकल्पना स्पष्ट केली. तसेच थोर शास्त्रज्ञ सर सी व्ही रमण यांचे जागतिक कीर्तीचे संशोधन “रमण परिणाम” यांचे सविस्तर मार्गदर्शन केले. ज्येष्ठ विज्ञान शिक्षिका सौ. मनीष वैद्य यांनी आपल्या मार्गदर्शनात विद्यार्थिनींचा विज्ञान विषयक दृष्टिकोन वाढविला. अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापिका अनीता बोरसे यांनी श्रद्धा व अंधश्रद्धा यांचे वैज्ञानिक दृष्टिकोनातून विवेचन केले.
कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन पूर्वा निकेश देशमुख इ.9 वी च्या विद्यार्थीनीने केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विज्ञान शिक्षक, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *