• Tue. Jun 17th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

नवनाथ तात्या गायकवाड यांच्या कार्याची हवेलीत चर्चा

Mar 3, 2023

Loading

नवनाथ तात्या गायकवाड यांच्या कार्याची हवेलीत चर्चा

लोणी काळभोर- समाज कार्याची आवड असणारे, गोरगरिबांच्या अडीअडचणी सोडवणारे,लोणी काळभोर चे युवा नेते, विमल दुध संघ चे मालक मा.श्री.नवनाथ तात्या गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त तीर्थक्षेत्र रामदरा महादेव मंदिर डोंगर परिसरात उंबर,कंरज, कांचन, वड, बुच, कदंब,कडुनिंब अशा जंगली वृक्षांची लागवड नवनाथ तात्या गायकवाड यांच्या शुभहस्ते करण्यात आली.तसेच लहान मुलांना वृक्षारोपण ची आवड निर्माण होण्यासाठी लोणी काळभोर मधील वाघुले वस्ती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या ठिकाणी आंबा ची झाडे शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना देण्यात आली तसेच झाडे लावा झाडे जगवा असे नारे देण्यात आले. तीर्थक्षेत्र रामदारा महादेव मंदिर डोंगर परिसरात ग्रीन फाउंडेशन महाराष्ट्र राज्य आयोजित एक लाख वृक्ष लागवड प्रकल्प राबविण्यात येत आहे त्या साठी दीड हजार फुट पाईप लाईन करण्यात आली आहे डोंगर परिसरात पाणी पोहचवण्यात यश आले आहे परंतु मोटारीला काही प्रोब्लेम आल्या मुळे मोटर बिघडल्याचे नवनाथ तात्या यानां समजले त्यांनी मोटारीला जो काही खर्च होईल तो सर्व खर्च वाढदिवसानिमित्त करणार आहे असे प्रतिपादन गायकवाड यांनी केले.
या वेळी लोणी काळभोर चे माजी उपसरपंच श्री. राजेंद्र आबा काळभोर, ग्रा.सदस्य ललिता राजेंद्र काळभोर, नवनाथ गायकवाड, ग्रीन फाऊंडेशन संस्थापक अध्यक्ष श्री.अमित जगताप, ग्रीन फाऊंडेशन पुणे जिल्हाध्यक्ष श्री.दत्तात्रय भाऊ शेंडगे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील गुरव मॅडम,बाबासाहेब यादव, जय चौधरी तसेच सर्व शिक्षक, विद्यार्थी, ग्रीन फाऊंडेशन, लोणी काळभोर ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *