• Tue. Jun 17th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

अमळनेरला जुन्या पेन्शनसाठी पेन्शन विराट मोर्चा..।
प्राथमिक ,माध्यमिक, उच्च माध्यमिक आरोग्य ,नगरपालिका, महसूल ,सर्वच कर्मचाऱ्यांचे पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी
जुन्या पेन्शन मागणीसाठी 2000 कर्मचारी महा रॅलीत…

Mar 18, 2023

Loading

अमळनेरला जुन्या पेन्शनसाठी पेन्शन विराट मोर्चा..।

प्राथमिक ,माध्यमिक, उच्च माध्यमिक आरोग्य ,नगरपालिका, महसूल ,सर्वच कर्मचाऱ्यांचे पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी

जुन्या पेन्शन मागणीसाठी 2000 कर्मचारी महा रॅलीत…

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)- अमळनेरला जुन्या पेन्शन साठी बेमुदत संप सुरू असून आज पाचव्या दिवशी विराट महामोर्चा निघाला. 2000 कर्मचारी या पेन्शनच्या महा रॅलीत उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराज नाट्य सभागृह येथून सर्व संघटनेचे पदाधिकारी व कर्मचारी यांची शिस्तबद्ध रॅली निघाली कर्मचाऱ्यांनी व पदाधिकाऱ्यांनी पेन्शन संदर्भात विविध घोषणा देऊन अमळनेर शहर दणाकावून सोडले. ही रॅली उपविभागी कार्यालय समोर येऊन रॅलीचे रूपांतर मोठ्या सभेत झाले या सभेमध्ये जुन्या पेन्शन समितीचे नाशिक विभागाचे कार्याध्यक्ष डॉ कुणाल पवार यांनी जुनी पेन्शन ही किती महत्त्वाची आहे व शासनाची नवीन पेन्शन किती घातक आहे या संदर्भामध्ये सविस्तर मार्गदर्शन केले व आगामी काळात आपल्याला लढा अधिक तीव्र करावा लागेल आज ह्या महारॅली आंदोलनाला सर्व संघटनेचे पदाधिकारी कर्मचारी बांधव भगिनींनी मोठी उपस्थिती लावल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक धन्यवाद त्यांनी व्यक्त केले.
पेन्शन पिडीत शिक्षिका पाकिजा पिंजारी म्हणाल्या की कर्मचारी कोणतेही पक्षाच्या विरोधात नाही, पण त्यांची हक्काची पेन्शन सरकारने दिली पाहिजे नाहीतर येणाऱ्या निवडणुकीत त्याचे पडसाद सरकारला भोगावे लागतील असेही सांगितले.
शिक्षण विस्ताराधिकारी तथा ग.स संचालक विजय पवार म्हणाले की 14 मार्चपासून जुनी पेन्शन ह्या न्याय मागणीसाठी संपूर्ण राज्यामध्ये बेमुदत आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनाला आमच्या संघटनेचा पूर्ण पाठिंबा आहे त्यामुळे शिक्षकांनी कोणत्याही मनामध्ये कारवाईचा बडगा याची भीती न बाळगता संपामध्ये सक्रिय सहभाग घ्यावा व आपली न्याय मागणी जोपर्यंत आपल्याला मिळत नाही तोपर्यंत माघार घेऊ नका असेही सांगितले.
शिक्षक नेते व ग.स संचालक रावसाहेब मांगो पाटील यांनी मेळाव्याला मार्गदर्शन करतांना सांगितले की सरकार कर्मचाऱ्यांच्या विरोधी अनेक कायदे आणत आहे. कर्मचाऱ्यांनी संघटित होणं काळाची गरज आहे. पेन्शन ही आपली न्याय मागणी आहे. सरकारला द्यावीच लागेल, नाही तर येणाऱ्या काळात सरकारला त्याची किंमत मोजावी लागेल. म्हणून आपला आंदोलन जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेऊन यशस्वी करावे व आपली मागणी मान्य होत नाही तोपर्यंत माघार नाही व ते
पुढे म्हणाले की पेन्शन धारकांचे पेन्शन 70 वर्षानंतर सरकार बंद करण्याच्या मार्गावर आहे म्हणून कर्मचाऱ्यांनी संघटित होणे काळाची गरज आहे असे त्यांनी सांगितले.
प्रताप कनिष्ठ महाविद्यालयाचे कर्मचारी संघटनेचे दिनेश भलकर यांनीही पेन्शन मेळावा व रँलीला मार्गदर्शन केले.

अमळनेरला पेन्शन महारँलीचे वैशिष्ट्ये

छत्रपती शिवाजी महाराज नाट्य सभागृहापासून तीन तीन जणांची शिस्तबद्ध लाईन होती. अगोदर महिला प्रथम स्थानावर होत्या नंतर शिक्षकेतर कर्मचारी महिला नंतर प्राथमिक शिक्षक, माध्यमिक व विविध कर्मचारी व त्याच्यानंतर शेवटी सर्व संघटनेचे पदाधिकारी अशा पद्धतीने नियोजन केले होते.शिक्षक बंधूंनी पांढरा ड्रेस परिधान केलेला होता व महिला भगिनींनी पांढरी साडी परिधान केलेली होती. डोक्यावर जुनी पेन्शन ची टोपी होती व सर्व स्वयंसेवक पेन्शन पिडीत बंधू-भगिनी घोषणा देत होते..

अनेक संघटनांचा पेन्शन मागणीसाठी पाठिंबा

कर्मचाऱ्यांच्या जुनी पेन्शनच्या या न्याय मागणीसाठी अमळनेर पाळसरे धरण संघर्ष समितीचे सुभाष चौधरी, कोकोकला सर पदाधिकारी व कार्यकर्ते यांनीही पाठिंबा दिला व राष्ट्रवादीच्या महिला नेत्या व जिल्हा परिषद सदस्या जयश्रीताई पाटील यांनीही रॅलीत सहभागी होऊन पाठिंबा दिला. आम आदमी पार्टी अमळनेर,नगरपालिका कर्मचारी संघटना, आरोग्य संघटना, महसूल संघटना, ग्रामसेवक, तलाठी संघटना, मुख्याध्यापक संघ, माध्यमिक शिक्षक संघ, कलाध्यापक संघ, ओबीसी शिक्षक असोसिएशन, समता शिक्षक परिषद, शिक्षकेतर कर्मचारी संघटना, शिक्षक सेना, कनिष्ठ माध्यमिक संघटना,प्रहार संघटना, प्राथमिक शिक्षक संघटना, प्राथमिक खाजगी संघटना, अशा विविध संघटनांनी जुनी पेन्शन या मागणीला आपला सक्रिय पाठिंबा दिला आहे.
ही जुनी पेन्शनला पाठिंबा दिला आहे विविध संघटनेचा जुनी पेन्शन साठी पाठिंबा आहे काँग्रेसनेही जुनी पेन्शन या मागणीसाठी पाठिंबा दिला आहे.

यांची होती विशेष उपस्थिती

माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष संजय पाटील यांनी सुत्रसंचालन केले तर आभार टिडीएफचे सुशिल भदाणे यांनी मानले. यावेळी टीडीएफ संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष संदीप घोरपडे, सामाजिक कार्यकर्ते रणजीत शिंदे,माध्यमिक शिक्षक पतपेढीच्या संचालक तुषार बोरसे ,मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्रकाश पाटील, शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे आर.डी बोरसे , जुनी पेन्शन संघटनेचे सुशील भदाने, शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे जितेद्र ठाकूर,गणित मंडळाचे डी.ए धनगर, सेवानिवृत्त मुख्याध्यापक एस.डी देशमुख, साने गुरुजी पतपेढीचे माजी अध्यक्ष कैलास बागूल, विज्ञान मंडळाचे डि.के.पाटील, सानेगुरुजी विद्यामंदिर शाळेचे मुख्याध्यापक संजय पाटील, समता शिक्षक परिषदेचे तालुका अध्यक्ष बापूराव पाटील, खान्देश शिक्षण मंडळाच्या विश्वस्त वसुंधरा दशरथ लांडगे,ओबीसी शिक्षक संघटनेचे ईश्वर महाजन,साने गुरुजी शिक्षक पतपेढीचे अध्यक्ष सचिन साळुंखे , शिक्षक भारती संघटनेचे आर जे पाटील,प्रहार संघटनेचे सुधीर चौधरी, मुख्याध्यापक संघाचे माजी तालुका अध्यक्ष एम.ए पाटील, हिंदी अध्यापक मंडळाचे आशिष शिंदे, निवृत्ती पाटील ,दिलीप पाटील,मनिष उघडे,डॉ किरण निकम, राजेंद्र पाटील ज्ञानेश्वर ईनशुलकर,दिपक पवार, एन आर चौधरी, सोपान भवरे,राडोळ सर,तळवी सर,भूगोल मंडळाचे मुकेश पाटील, जितेंद्र पवार, आरोग्य संघटनेचे वसंत बैसाणे, मा.ग.स.संचालक वाल्मिक मराठे,शिक्षक संघटनेचे संदीप वाघ,क्रीडा संघटनेचे सुनील वाघ, नगरपालिका कर्मचारी संघटनेचे सोमचंद संदानशिव, भानुदास पवार योगेश पाटील ,राहुल पाटील ,आशिष पवार, दिलीप सोनवणे, किशोर माळी, केंद्रप्रमुख ज्ञानेश्वर पाटील, मकरंद निळे, विजय ठाकरे, समता शिक्षक परीषदेचे अजय भामरे,टीडीफ संघटनेचे उमेश काटे, राष्ट्रवादी शिक्षक संघटनेचे हर्षल पाटील, महेंद्र रामोशे,गोपाल हळपे ,ए.बी.धनगर,मुख्याध्यापक अनिल महाजन, एच.ओ.माळी,सुरेश महाजन एन.जी देशमुख ,दीपक महाजन ,जे एस पाटील, रवींद्र कोळीसह अनेक कर्मचारी उपस्थित होते.

रँली व मोर्चेला शिस्तबद्धासाठी स्वयंसेवकांनी घेतली मेहनत

सीमा पाटील, भाग्यश्री साळवे ,कविता मनोरे ,निवेदिता कापडणे, मेघा पाटील, मोनिका पाटील, कविता पाटील, दिपाली पवार ,कल्पना साळुंखे, मनीषा पाटील, भारती चौधरी,मंगला सोनवणे, मनीषा गवते, ललिता माळी, रूपाली पवार, सविता देशमुख ,भावना बेहेरे, वर्षा पाटील, शितल पाटील, प्रमिला मोरे ,प्रेरणा पाटील, पूनम पाटील, उर्मिला पाटील,सविता मोरे, क्रांती साळुंखे तर
साहेबराव गोडसे, किशोर चौधरी प्रशांत पवार, योगेश कापडणे, जयेश शिरसाट, अविनाश पाटील ,महेंद्र रत्नपारखी , अंकित पाटील, अमित पाटील, विशाल वाघ ,हर्षल सैंदाणे, गौरव शिरसाठ, किरण सनेर, संदीप पाटील ,जगदीश पाटील, योगराज कोळी, एकनाथ पाटील सह अनेक स्वयंसेवकांनी सहकार्य केले.

पेन्शनच्या भव्य रॅलीचे काही क्षणचित्रे