• Wed. Jun 18th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

नवीन शैक्षणिक वर्षाची
अमळनेर तालुक्यातील शाळांना पाठ्यपुस्तक वितरण

Jun 5, 2023

Loading

नवीन शैक्षणिक वर्षाची
अमळनेर तालुक्यातील शाळांना पाठ्यपुस्तक वितरण

शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना दिली जाणार पुस्तक

गटशिक्षणाधिकारी विश्वासराव पाटील

अमळनेर प्रतिनिधी
समग्र शिक्षा अभियान अंतर्गत शासकीय, जि.प व न.पा. तसेच खाजगी अनुदानित शाळांतील इ. 1 ली ते इ. 8 वी तील विद्यार्थ्यांसाठी शासनामार्फ़त मोफ़त पाठ्यपुस्तक योजना राबविली जात असून
शालेय विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी शाळास्तरावरून पाठ्यपुस्तक वितरण केले जाते. अमळनेर
तालुक्यात सन 2023-24 या शैक्षणिक वर्षाकरिता खालीलप्रमाणे पाठ्यपुस्तक प्राप्त झाले आहे.
इयत्ता पहीली ते आठवीचे असे एकूण 28897 ( मराठी माध्यम -20713, सेमी इंग्रजी माध्यम 8184) विद्यार्थ्यांसाठी मागणी केलेली
आहे. वरील मागणी पैकी मराठी माध्यमाचे 20713 संच व सेमी इंग्रजी चे 8184 पैकी 6000 पुस्तके प्राप्त
असून दि. 05/06/2023 पासून शाळास्तरावर वाटप सुरु करण्यात आलेला आहे. तालुकास्तरावरून
पाठ्यपुस्तक वाटप नियोजन केलेले असून पाच दिवसात सर्व शाळांवर पाठ्यपुस्तक पोहोच होणार आहे. आज रोजी मा. गटविकास अधिकारी विशाल शिंदे साहेब, गटशिक्षणाधिकारी विश्वास पाटील, शिक्षणविस्तार अधिकारी पी. डी.. धनगर, केंद्रप्रमुख चंद्रकांत साळुंखे, प्रवीण वाडीले ज्ञानेश्वर पाटील यांच्या हस्ते पाठ्यपुस्तक वाटप करण्यास सुरुवात झाली. उर्दू माध्यमाचे 2109 संच अध्याप प्राप्त नाही. प्राप्त होताच लगेच वाटप करण्यात येतील.
गटसाधन केंद्रातील सर्व कर्मचारी हे पाठ्यपुस्तक वाटप कामी विशेष परिश्रम घेत आहेत.

 

फोटो

पाठ्यपुस्तक वाटप करताना गटविकास अधिकारी विशाल शिंदे,गटशिक्षणाधिकारी विश्वास पाटील,शिक्षण विस्तार अधिकारी पी डी धनगर,केंद्रप्रमुख किरण शिसोदे,प्रविण वlडिले,चंद्रकांत साळुंखे, ज्ञानेश्वर पाटील,पाठ्यपुस्तक घेताना दहिवद माध्यमिक विद्यालय चे प्रफुल्ल भदाने सर

You missed