• Tue. Jun 17th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

शाहू महाराजांची महानता व त्यांनी लोक कल्याणासाठी केलेले कार्य प्रेरणादायी-
जेष्ठ पत्रकार संजय सुर्यवंशी

Jun 26, 2023

Loading

शाहू महाराजांची महानता व त्यांनी लोक कल्याणासाठी केलेले कार्य प्रेरणादायी

जेष्ठ पत्रकार संजय सुर्यवंशी

देवगांव देवळी हायस्कूलमध्ये राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त व्याख्यान

अमळनेर प्रतिनिधी
बहुजनांची परिस्थिती सुधारयची असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही हे ओळखून छत्रपती शाहू महाराजांनी शिक्षण सर्वसामान्य, बहुजन व दलित बांधवांसाठी खुले केले. समाजातील शोषित व मागास वर्गाला आरक्षण देण्याची कल्पना सर्वप्रथम जर कुणी मांडली असेल तर ती शाहू महाराजांनी. समाजातील विषमता, भेदाभेद नष्ट करण्याच्या प्रयत्नांमध्ये त्यांना तत्कालीन उच्चवर्णीयांचा कडवा विरोध सहन करावा लागला पण त्यांनी ह्या विरोधाला
जुमानता आपले कार्य पूर्णत्वास नेले. आज मागास, दलित, बहुजनांची आर्थिक व सामाजिक परिस्थिती सुधरली ह्याचे कारण छत्रपती शाहू महाराजांचे कठोर प्रयत्न, त्यांनी आखलेल्या व पूर्णत्वास नेलेल्या योजना.रयतेचा राजा अशी पदवी रयतेनेच बहाल करावी ह्यातच शाहू महाराजांची महानता व त्यांनी लोक कल्याणासाठी केलेले कार्य व त्यामुळे बहुजनांच्या मनात त्यांना मिळालेले मानाचे स्थान ह्याची कल्पना येते असे…असे देवगाव देवळी येथील महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूलमध्ये राजश्री शाहू महाराज यांच्या जयंती निमित्ताने
व्याख्यान मालेत महाराष्ट्र पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष व जेष्ट पत्रकार संजय सुर्यवंशी बोलत होते
ते पुढे म्हणाले की आजपर्यंत भारतात अनेक समाजसुधारक होऊन गेले, परंतु शाहू महाराजांचे वेगळेपण असे कि त्यांनी बहुजनांची केवळ सामाजिक परिस्थिती सुधारण्याकडेच लक्ष न देता त्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल ह्याची
सर्वांगीण विकास कसा होईल ह्याची प्रत्यक्ष तरतूद केली.
शिक्षणानंतर बहुजन व मागासलेल्या वर्गाच्या रोजगाराचीही सोय व्हावी, ते आर्थिक दृष्ट्यासुद्धा सक्षम व्हावेत ह्यासाठी सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण लागू करण्याची संकल्पना त्यांनीच मांडली व म्हणूनच त्यांना आरक्षणाचे जनक म्हटले जाते असेही त्यांनी सांगितले.
यावेळी आठवी व दहावीच्या विद्यार्थ्यांनी मनोगत व गित सादर केले.
सानेगुरुजी नुतन विदयालयाचा नववीचा
यश राजकुमार पाटील या विद्यार्थ्यांने राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवनावर आधारित व्याख्यान दिले.

जेष्ट पत्रकार संजय सुर्यवंशी ,विद्यार्थी यश राजकुमार पाटील यांनी राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन स्काऊट शिक्षक एच.ओ.माळी यांनी केले. क्रिडा शिक्षक अरविंद सोनटक्के यांनी व्याख्याते संजय सुर्यवंशी यांचा तर विद्यार्थी यश पाटील व्याख्याते याचा सत्कार स्काऊट शिक्षक एस.के महाजन केला. कार्यक्रमाचे आभार एस.के.महाजन यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी प्रयत्न केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *