• Mon. Jun 16th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२३ साठी ऑनलाईन आवेदनाचे शिक्षणाधिकारी मोहन देसले यांचे शिक्षकांना आवाहन!

Jun 28, 2023

Loading

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२३ साठी ऑनलाईन आवेदनाचे शिक्षणाधिकारी मोहन देसले यांचे शिक्षकांना आवाहन!

(प्रा.भगवान जगदाळे : मराठी लाईव्ह न्यूज)
निजामपूर-जैताणे (ता.साक्री जि.धुळे) : राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२३ करिता ऑनलाईन पद्धतीने पात्र शिक्षकांकडून आवेदन मागविण्यात येत असून http://nationalawardstoteachers.education.gov.in या वेबपोर्टलवर ऑनलाईन स्वनामांकन करण्याची मुदत दि. १५/०७/२०२३ पर्यंत आहे. यात जास्तीत जास्त शिक्षकांना सहभागी होण्याचे आवाहन धुळे जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी मोहन देसले यांनी केले आहे.

यासंदर्भात शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद, धुळे कार्यालयातर्फे प्रकटन प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यानुसार शिक्षण हा समाजाच्या सर्वांगीण विकासाचा पाया आहे. समर्पित वृत्तीने काम करणान्या शिक्षकांमुळेच समाज आणि राज्याचा तसेच राष्ट्राचा विकास होतो. अशा समर्पित वृत्तीने काम करणाऱ्या शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने गौरविले जाते. शैक्षणिक वर्ष 2022-23 साठी हे पुरस्कार शासन निर्णय क्र.पीटीसी/ २०२२ प्रक्र. ३४ /टीएनटी-४ दि. २८/०६/२०२२ मधील निकषाव्दारे प्रदान करण्यात येणार आहेत, आवेदने सादर करू इच्छिणाऱ्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक व मुख्याध्यापकांनी buuptioninlawardstoteachers.education.gov.in या वेबलिंकवर आपली आवेदन पत्रे दिनांक १५/०७/२०२३ पूर्वी सादर करावेत, असेही म्हटले आहे.

शिक्षक पात्रतेच्या अटी व निकष पुढीललप्रमाणे आहेत.
१.सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनाच्या अनुदानित व शासकीय शाळांचे शिक्षक आवेदनपत्र भरू शकतात.
२.सामान्यपणे सेवानिवृत्त शिक्षक पुरस्कारासाठी पात्र नाहीत. परंतु ज्या शिक्षकानी कैलेंडर वर्षांचा काही भाग (किमान ४ महिने, ३० एप्रिलपर्यंत) सेवा केली आहे. अशा पात्र शिक्षकांचा पुरस्कारासाठी विचार केला जाऊ शकतो.
३. शैक्षणिक प्रशासक, शिक्षण निरीक्षक, प्रशिक्षण संस्थांचे कर्मचारी या पुरस्कारासाठी पात्र नाहीत.
४.शिक्षक, मुख्याध्यापक हे शिकवणी वर्ग घेणारे नसावेत.
५.शिक्षक, मुख्याध्यापकाची एकूण सलग सेवा किमान १० वर्ष झालेली असावी.
६.कंत्राटी शिक्षक आणि शिक्षकमित्र पात्र नाहीत.

अर्ज करण्याची पद्धत :
१.सर्व अर्ज ऑनलाईन वेबपोर्टलवर करणे आवश्यक आहे.
२.राज्य/केंद्रशासित प्रदेशाच्या बाबतीत शिक्षक आणि शाळा प्रमुखांनी विहीत अंतिम तारखेपूर्वी वेब पोर्टलद्वारे ऑनलाईन अर्ज भरून थेट सादर करावेत,
३.अर्जदाराने एंट्रीफॉर्मसह ऑनलाइन पोर्टफोलियो जमा करावा, पोर्टफोलियो मध्ये दस्तऐवज, साधने, क्रिया कलापांचे (Activities) अहवाल, क्षेत्रभेटी, छायाचित्र, ऑडियो, व्हिडियो इत्यादीचा समावेश असावा.
४.प्रत्येक अर्जदाराने दिलेली माहिती ही खरी असून चुकीची आढळल्यास शिस्तभंगाच्या कारवाईस वैयक्तिक जबाबदार राहील, असे हमीपत्र द्यावे!

जास्तीत जास्त आवेदने दि. १५/०७/२०२३ पूर्वी सादर करणे बाबतचे आवाहन श्री.मोहन देसले, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद, धुळे यांचेमार्फत करण्यात येत आहे.