उपक्रमशिल शिक्षिका भारती कुळथे एका सावित्रीच्या लेकीची सेवापूर्ती
अमळनेर प्रतिनिधी
व्यक्तीच्या जीवनात त्याचा पहिला गुरु त्याची आई असते. नंतर औपचारिक शिक्षण प्रक्रियेत त्यास विविध गुरु
भेटतात. ते सर्व शाळा नावाच्या चार भिंती आड पुस्तकी ज्ञानासह वैयक्तिक जीवनातील चांगले – वाईट अनुभव यांची
सांगड घालून त्यात संस्कार व मूल्य रूजवित असतात.यात जे गुरू आपल्या विद्यार्थ्यांना वात्सल्याची अनुभूती देतात
ते प्रभावी ठरतात.असेच एक प्रभावी व्यक्तिमत्त्व म्हणजे सौ.भारती दिनकर कुळथे (सोनार) म्याडम होय.
दि.१ जून,१९९८ रोजी जि.प.शाळा,डहाळेवाडी,ता.इगतपुरी येथून त्यांच्या सेवेचा श्रीगणेशा झाला.त्यानी दुर्गम आदिवासी
क्षेत्रातील आपल्या ६ वर्षाच्या सेवेत मुख्यालयी राहुन कामाविषयी प्रामाणिकपणा व मातृवत्सल स्वभावातुन विद्यार्थी व
पालकांशी निर्माण झालेले ऋणानुबंध आजही जपले आहेत.तेथून पुढे जिल्हा परिषद शाळा,रोजगांव,ता.सक्रि येथिल ९ वर्ष सेवे नंतर वाघापूर,ता.साक्रि येथिल ६ वर्षाच्या सेवेत त्या शाळेला जिल्हा परिषदेचा आदर्श शाळा पुरस्कार मिळाला त्यात इतर सहकार्यांसह त्याचं ही
मोलाचं योगदान होते.पुस्तकी ज्ञाना बरोबर प्रत्येक्ष अनुभव म्हणून जिल्हा परिषद शाळा, वाघापूर च्या तत्कालीन किशोरवयीन
विद्यार्थिनींना वैयक्तिक स्वच्छतेसह वाढत्या वयात होणारे शारिरीक व मानसिक बदलांच्या अनुभूती साठी स्व खर्चाने पॅडमॅन चित्रपट दाखविला.त्यांच्या या कामाची दखल घेऊन पंचायत समिती साक्रि चे तत्कालीन गट शिक्षण अधिकारी ,मा.श्री.बच्छाव
साहेब यांनी प्रमाणपत्र देऊन त्यांना गौरविले .त्यानंतर आज पर्यंत जिल्हा परिषद शाळा, जुने भदाणे,ता.जि.धुळे येथे ४ वर्ष सेवा झाली. या एकूणच २५ वर्षाच्या सेवेत त्या
कार्यरत असलेल्या प्रत्येक शाळेत तेथील सहकारी, विद्यार्थी व पालकांशी त्यांनी आपल्या कार्यशैलीतून एक वेगळं नातं
निर्माण केले आहे.कारण त्यांनी आपल्या वैयक्तिक लाभ व हिताचा विचार न करता विद्यार्थी हितास प्राधान्य दिले.म्हणून या दोन वोळीतून सांगावसे वाटते…
बाल मनास संस्कारुन तुम्ही नवचैतन्य त्याशी दिधले,
या नव्या पिढीला त्या संस्कारातून नवजीवन ते गवसले !
शब्दांकन
श्री.दिपक मुरलीधर पवार,सर
मा.अध्यक्ष-हिंदी अध्यापक मंडळ अमळनेर
उपशिक्षक
लोंढवे,ता.अमळनेर,जि.जळगांव

