
धनदाई महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद पवार यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार,!
अमळनेर: येथील धनदाई कला व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ प्रमोद पवार हे दिनांक 30 जून रोजी निवृत्त होत असल्याने संस्थेचे अध्यक्ष डी. डी. पाटील तसेच महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचा सत्कार केला. याप्रसंगी महाविद्यालय विकास समिती प्रमुख के. डी. पाटील, विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्रा डॉ. संदीप नेरकर, राष्ट्रीय विचार प्रबोधन अभियानाचे अध्यक्ष प्रा. अशोक पवार, मारवड महाविद्यालयाचे डॉ. पवन पाटील, राणी लक्ष्मीबाई महाविद्यालयाचे डॉ. मनीष करंजे, प्रताप महाविद्यालयाचे प्रा नितीन पाटील, डॉ.योगेश तोरवणें, प्रा. सुनील राजपूत यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
” डॉ. प्रमोद पवार यांनी उच्च शिक्षण क्षेत्रात 39 वर्ष सेवा दिली यातील 14 वर्ष ते धनदाई महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून कार्यरत होते या काळात महाविद्यालय विविध क्षेत्रात नावारुपाला आले असून त्यांच्या कर्तुत्वामुळे विद्यापीठाने त्यांना उत्कृष्ट प्राचार्य म्हणून देखील गौरविले आहे” असे प्रतिपादन महाविद्यालयाच्या आयक्यूएसी विभागाचे प्रमुख प्रा डॉ लिलाधर पाटील यांनी केले. याप्रसंगी डॉ. संदीप नेरकर यांनी प्राचार्य पवार हे राज्यशास्त्र व लोकप्रशासन या विषयातील ज्येष्ठ तज्ञ व मार्गदर्शक असल्याचे सांगितले.
धनदाई माता एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डी. डी. पाटील यांनी महाविद्यालयाच्या प्रगतीत प्राचार्य पवार यांची महत्त्वाची भूमिका असल्याचे प्रतिपादन केले तर प्राचार्य पवार यांनी सत्काराला उत्तर देताना या सर्व यशात संस्थाचालक तसेच सहकाऱ्यांनी साथ दिल्यामुळे ही प्रगती शक्य झाल्याचे उपस्थित त्यांना सांगितले यानंतर जय योगेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, शांतिनिकेतन प्राथमिक विद्यामंदिर तसेच धनदाई माता तंत्रनिकेतन विद्यालयाचे प्राचार्य तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी प्राचार्य पवार यांचा सत्कार केला.