

माँ चामुंडा प्रि स्कूल दहिवद येथे गावातील जेष्ठ सेवानिवृत्त शिक्षकांसोबत शिक्षक दिवस साजरा करण्यात आला..
मराठी लाईव्ह न्यूज प्रतिनिधी : भुषण महाजन :
सावित्रीबाई फुले विचार मंच बहुउद्देशीय संस्था संचालित माँ चामुंडा प्रिस्कूल दहिवद येथे 5 सप्टेंबर 2023 रोजी गावातील ज्येष्ठ सेवानिवृत्त शिक्षकांसोबत शिक्षक दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान नितू दिनेश शेलकर यांनी स्वीकारले कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून गावातील ज्येष्ठ शिक्षक आधार पांडू पाटील रमेश नामदेव पाटील जगन्नाथ भिका शेलकर गुलाबराव यशवंत बोरसे विश्वास दलपत पाटील मधुकर पोपट पाटील भिकन पंडित पवार मनोहर निळकंठ भदाणे संस्थेच्या उपाध्यक्ष प्रतिभा जिजाबराव माळी सचिव जिजाबराव मधुकर माळी सदस्य रामकृष्ण मधुकर माळी उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरस्वती माता सावित्रीबाई फुले डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन व फुलहार मान्यवरांच्या हस्ते अर्पण करण्यात आले त्यानंतर प्रमुख अतिथींचा सन्मानचिन्ह व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला माँ चामुंडा प्रि स्कूल च्या शिक्षिका नेहा आकाश माळी व दिपाली प्रवीण पाटील यांना साडी सन्मानचिन्ह गुलाब पुष्प देऊन अध्यक्ष व उपाध्यक्ष यांनी सत्कार केला तसेच गावातील ओम ब्रिक्स सप्लायर्स गुलाबराव शिवाजी कुंभार यांनी संस्थेस दहा फोटोफ्रेम सप्रेम भेट दिले म्हणून त्यांचाही सन्मानचिन्ह व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला सत्कारानंतर विद्यार्थ्यांची भाषणे झाली नंतर ज्येष्ठ शिक्षक आधार पांडू पाटील व गुलाबराव बोरसे सर तसेच भिकन पंडित पवार सर यांची मार्गदर्शनपर भाषणे झाली. शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष नीतू दिनेश शेलकर यांनी भाषण केले. तसेच वत्सलाबाई जगन्नाथ शेलकर मधुकर काळू माळी विजय हिम्मत माळी प्रशांत चिंधू माळी यांनी कार्यक्रमाला उपस्थिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नेहा आकाश माळी व दिपाली प्रवीण पाटील यांनी केले आलेल्या पाहुण्यांचे आभार संस्थेचे सचिव जिजाबराव मधुकर माळी यांनी मानले.