• Tue. Jun 17th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

साने गुरुजी कन्या हायस्कूल मध्ये 5 सप्टेंबर स्वयंशासन दिन म्हणुन साजरा

Sep 5, 2023

Loading

साने गुरुजी कन्या हायस्कूल मध्ये 5 सप्टेंबर स्वयंशासन दिन म्हणुन साजरा

साने गुरुजी कन्या हायस्कूल मध्ये 5 सप्टेंबर हा डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात आला हया दिवशी विद्यार्थिनिंनी शिक्षकांची भूमिका केली . व दिवसभर वर्गात अध्यापनाचे कार्य केले शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती बोरसे मॅडम यांची भूमिका प्रतिक्षा कापडणीस या विद्यार्थिनिने दिवसाचा कार्यभार सांभाळला ह्या विद्यार्थिनिंना मार्गदर्शन श्रीमती बोरसे मॅडम यांनी केले. कार्यक्रम प्रसंगी अध्यक्ष म्हणुन संस्थेचे सचिव दादासो संदिप घोरपडे हे होते. प्रमुख पाहुणे म्हणुन राष्ट्रीय प्रशिक्षक श्री सागर धनाड व श्री अतुल महाजन व शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती अनिता बोरसे मॅडम व शालेय समितीचे अध्यक्ष श्री. बाविस्कर नाना उपस्थित होते. मुख्याध्यापकांची भूमिका प्रतिक्षा कापडणीस यांनी केली व शिक्षक व महिला शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांची भूमिका सुद्धा विद्यार्थिनिंनी केली व पूर्ण तासिका व दिवसभर शाळेचा कार्यभार विद्यार्थिनिंनी सांभाळला. अध्ययन व अध्यापनाचे काम केले. तद्नंतर एस. एम. गोरे सभागृहात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पन व दिपप्रजलन अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांनी केले. मनोगत मध्ये शिक्षक झालेल्या विद्यार्थिनिं मध्ये नंदिनी पाटील प्रांजल कुसुंबे व मुख्याध्यापिका झालेली प्रतिक्षा कापडणीस यांनी आपले मनोगत व्यक्त केले. परिक्षकांचे वतीने श्री० जे एस . पाटील .व शिक्षकांच्या वतीने श्री. मुकेश पाटील .यांनी विद्यार्थिनिंना मार्गदर्शन केले. व्यासपीठावरील मान्यवरांमधुन प्रमुख पाहुणे श्री. सागर धनाड यांनी सांगितलेकी तुमची शाळा खरच सुंदर आहे की जे असे कार्यक्रम राबवतात तुम्ही गुरुंनी सांगितलेल्या मार्गावर चला म्हणजे यशस्वी व्हाल श्री . बावीस्कर नाना यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात त्याच प्रमाणे शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती . बोरसे मॅडम यांनी माझ्या विद्यार्थिनी कुठल्याही क्षेत्रात कमी नाही . क्रिडा असो की अभ्यासात सर्वच बाबतील आघाडीवर त्याच बरोबर कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. घोरपडे सर यांनी लिलाताईचे उदाहरण देऊन त्यांच्या सारख्या शुर व धाडसी व्हा व पुढे रहा. कार्यक्रमाच्या शेवटी निकाल जाहिर केला सुत्रसंचलन १० वी च्या विद्यार्थिनिनी केले . उत्कर्षा महाजन, निकिता पाटील पूर्वा देशमुख दिशा पाटील, आभार दिशा पाटील, यांनी केले . नेहा सांबरे व उर्वशी पाटील यांनी यशस्वीतेसाठी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *