• Tue. Jun 17th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

अल्पवयीन पीडितेचे अपहरण करून , तिच्यावर अत्याचार केल्याच्या प्रकरणातील एका संशयित आरोपीला जामीन

Sep 6, 2023

Loading

अल्पवयीन पीडितेचे अपहरण करून , तिच्यावर अत्याचार केल्याच्या प्रकरणातील एका संशयित आरोपीला जामीन

अमळनेर प्रतिनिधी
अल्पवयीन पीडितेचे अपहरण करून , तिच्यावर अत्याचार केल्याच्या प्रकरणातील एका संशयित आरोपीला मा. जिल्हा व सत्र न्यायालयाने जामिनावर मुक्त करण्याचे आदेश दिनांक 04 सप्टेंबर रोजी दिले आहेत . सदर गुन्हा हा IPC कलम 376 , 363 व 366 , तसेच प्रोटेक्शन ऑफ चाईल्ड फ्रॉम सेक्शुल ऑफेन्सच्या ( पोक्सो ) कलम 4 , 6 , 8 , 10 व 12 या कलमाअन्वये दाखल करण्यात आल्याने , आरोपीला अटक करण्यात आलेली होती . आरोपीच्या वतीने ॲड. सारांश धनंजय सोनार यांनी जामीन अर्ज दाखल करून , विविध महत्वपूर्ण मुद्यांच्या आधारे गुन्ह्याच्या फोलपणाबद्दल सदर प्रकरणी आपला युक्तिवाद केला .* ततपश्चात आरोपीची रुपये 25,000 च्या जातमूचलक्यावर मुक्तता करण्याचे आदेश मा. न्यायालयाने दिले आहेत .
पीडित अल्पवयीन असली तरी तिला या संबंधांच्या व स्ववर्तनाच्या परिणामांची जाणीव होती असे प्रथमदर्शनी दिसते , असे निरीक्षण स्पष्ट करून न्यायालयाने अटी व शर्तींसह जामीनअर्ज मंजूर केला

युक्तिवाद केला नंतर ,अँड सारांश सोनार यांना ऍड. एस आर पाटील यांचे मार्गदर्शन लाभले…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *