
कन्या प्रशाला यांच्या वतीने रामदरा येथे वृक्षारोपण
लोणी काळभोर- तीर्थक्षेत्र रामदरा महादेव मंदिर डोंगर परिसरात ग्रीन फाउंडेशन महाराष्ट्र राज्य, वनविभाग यांच्या वतीने पाच लाख वृक्ष लागवड प्रकल्प राबविण्यात येत आहे या अनुषंगानेच लोणी काळभोर मधील कन्या प्रशाला यांच्या वतीने करंज,चिंच, कडुलिंब,शिरस, बेल, उंबर,वड, अशा ३०० जंगली वृक्षांचे वृक्षारोपण केले. या वेळी कन्या प्रशाला मुख्याध्यापिका निशा झिंजुरके मॅडम, ग्रीन फाऊंडेशन संस्थापक अध्यक्ष अमित जगताप,नितीन सुदाम काळभोर तसेच कन्या प्रशालेतील कदम सर, जेधे सर, राठोड सर, शिंगे सर, रोकडे सर, आणि कन्या प्रशालेतील विद्यार्थिनी उपस्थित होत्या . वृक्ष हे आपल्या पर्यावरणाचा सर्वात महत्त्वाचा घटक आहेत. आपल्या अवतीभोवती असणारी हि झाडे आपल्याला फक्त प्राणवायूच न देता इतर अनेक गोष्टीही देतात. वृक्षांपासून आपल्याला सावली मिळते थोडक्यात एक प्रकारचा निवाराच मिळतो पर्यावरणाचा सर्वात महत्त्वाचा घटक आहेत प्रतिपादन कन्या प्रशाला मुख्याध्यापिका निशा झिंजुरके यांनी केले.