• Fri. Jun 20th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

कुर्ला गांधी बाल मंदिर हायस्कूल येथे दहीहंडी उत्सव संपन्न

Sep 6, 2023

Loading

कुर्ला गांधी बाल मंदिर हायस्कूल येथे दहीहंडी उत्सव संपन्न

गणेश हिरवे
मुंबई प्रतिनिधी

गांधी बाल मंदिर शाळा कुर्ला येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही श्रीकृष्ण जन्मोत्सव व गोपाळकाला (दहीहंडी) उत्सव अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी इयत्ता सातवी व आठवीच्या विद्यार्थ्यांनी दहीहंडी फोडण्याचा आनंद लुटला. विशेष म्हणजे मुलींनी तीन थर लावून दहीहंडी उत्साहात फोडली. सर्व सण उत्सव अत्यंत आनंदाने साजरे करणे, त्या सणाविषयी माहिती देणे हे शाळेचे वैशिष्ट आहे .शाळेचे मुख्याध्यापक अनिल पांचाळ, पर्यवेक्षक रवींद्र खोंडे यावेळी सहभागी झाले होते. तसेच रत्नकांत विचारे, शिंदे सर, पांडुरंग खुळे, अमोल जागले, अवधूत चव्हाण, घनश्याम जोशी अश्विन बोरणारे, बाळाराम बांगारे , मंगला गरुड, अश्विनी संख्ये, अर्चना सातपुते ,अर्चना जाधव आदी शिक्षक मान्यवरही यावेळी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे आयोजन शाळेतील शिक्षक व एन सी सी प्रमुख विश्वनाथ पांचाळ यांनी केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *