कॉर्नेल महा६० या स्टार्टअँप उपक्रमात निर्मल नेमाडे यांच्या स्टार्ट अँपची निवड.
सर्वत्र अभिनंदन…!!
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
जिद्द चिकाटी व आत्मविश्वास राहिला तर मनुष्य कोणत्याही क्षेत्रांत आपले करीयर करून गावाचे नावलौकिक करू शकतो..असेच नांदेड येथील पण वैद्यकीय सेवेसाठी स्थायिक झालेले डॉ नेमाडे दाम्पत्य यांनी आपल्या दोन्ही मुलांवर शिक्षणाचे योग्य बाळकडू देऊन नावलौकिक केला आहे.निर्मलच्या या गगणभरारीने सर्वत्र अभिनंदन होत आहे…
सविस्तर माहिती अशी कि ग्रामीण भागातील निर्मल नेमाडे यांच्या स्टार्ट अँप ची Cornell University New York या जगप्रसिद्ध विद्यापीठ व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने स्टार्टअप साठी असणाऱ्या Cornellmaha60 या उपक्रमात निवड झाली असून..10 हजार registration मधून 60 स्टार्ट अप ची निवड करण्यात आली असून . घन कचरा व्यवस्थापन व कृषी व्यवसाय या संकल्पनेवर आधारित त्यांच्या स्टार्ट अँप आयडिया ला प्रशिक्षणासाठी पॅनल कडून पसंती मिळाली. Cornell University कडून प्रशिक्षण मिळणार असून शासनाच्या काही योजनांमध्ये सहभागी केले जाणार आहे.निर्मल नेमाडे यांनी पुणे विद्यापीठातून व्यवसाय व्यवस्थापनाची पदवी घेतली आहे त्यांचे प्राथमिक शिक्षण हे जिल्हा परिषदेच्या शाळेत कळमसरे गावी झाली आहे. सेंद्रिय शेती व पर्यावरण संबंधित उपक्रमामध्ये त्यांना आवड आहे.
कळमसरे येथील वास्तव्यात असलेले डॉ सुधाकर
नेमाडे यांचे ते चिरंजीव आहेत..त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
